पांढरीपूल येथे कडकडीत बंद व रास्ता रोको

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर-औरंगाबाद रोडवरील पांढरीपूल येथे शनिवारी सकाळी खोसपुरी, वांजोळी, पांगरमल या भागातील 100 ते 150 शेतकर्‍यांनी एकत्र येत दूध, कांदे, डाळिंब, पपई रस्त्यावर टाकून रास्ता रोको आंदोलन करत शेतकर्‍यांच्या विविध मागण्या मान्य करण्यासंदर्भात कडकडीत बंद पाळला.

 

 
आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख, खोसपुरीचे सरपंच सोमनाथ हारेर, युवा नेते आदीनाथ काळे, बाबासाहेब खंडागळे, अमोल भवार, बाळासाहेब दाणी, अमोल सुद्रुक, गणेश शिंदे, दत्ता काळे, नारायण भवार, नीलेश आव्हाड, भरत हारेर, संतोष बोरुडे, बाळासाहेब काळे, संदीप पालवे यांच्यासह अनेकजण या सहभागी झाले होते.

 

 

नगर-औरंगाबाद हायवेवर या आंदोलनामुळे वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. सरकारने शेतकर्‍यांच्या 70 टक्के मागण्या मान्य केल्याचे समजल्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याचे सरपंच सोमनाथ हारेर यांनी सांगितले. तर शेतकरी संपाविषयी निर्णय न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

LEAVE A REPLY

*