पांगरमलचे दोषारोपपत्र दोन दिवसांत न्यायालयात

0

सीआयडीचे उपअधीक्षक मोरे यांची माहिती 

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद निवडणूक काळात झालेल्या पांगरमल येथील विषारी दारू मृत्युकांड प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) येत्या दोन दिवसांत न्यायालयात दोषारोप दाखल करणार आहेे. दोषारोप दाखल करण्यासाठी सीआयडीच्या अधिकार्‍यांनी कागदपत्रांची जुळवाजुळव जवळपास पूर्ण केली आहे. येत्या दोन दिवसांत या प्रकरणी न्यायालयात

दोषारोप दाखल होणार असल्याची माहिती सीआयडीचे कोल्हापूर विभागाचे उपअधीक्षक गणेश मोरे यांनी दिली. पांगरमलच्या विषारी दारूच्या मृत्युकांडात 10 जणांचा बळी गेलेला आहे. या प्रकारणात एकूण 18 आरोपी असून यातील एकाचा मृत्यू झाला असून जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्री मोकाटे अद्याप पसार आहे. यामुळे 17 आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे. पोलीसांनी आतापर्यंत 16 आरोपींना पकडण्यात यश आले असून काही दिवसांपूर्वी आरोपी राजू घुगे याचा अपघातात मृत्यू झाला होता. जिल्हा परिषद निवडणुकीच्या दोन दिवस आधी मोकाटे आणि भिमराज आव्हाड यांच्या उमेदवार असणार्‍या पत्नीच्या प्रचारार्थ दारू व जेवण पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीसाठी भिमराज आव्हाड याने दारू आणू न दिली होती. मात्र, आणलेली दारू बनावट असल्याने 10 जणांना आपले प्राण गमवावे लागले.

पोलीसांच्या तपासात जिल्हा रुग्णालयाच्या उपहारगृहात ही बनावट दारू तयार करून विकण्याचा उद्योग सुरू असल्याचे समोर आले होते. या प्रकरणात जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ अधिकर्‍यांची चौकशी झालेली आहे. मात्र, अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही. या दारूकांडाचा तपास सुरूवातीला पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांनी जवळपास पूर्ण केला होता. मात्र, महिनाभरा पूर्वीच सरकार पातळीवरून हा तपास सीआयडीकडे देण्याचे आदेश झाले. दोषारोपपत्र दाखल करण्यापूर्वी विशेष पोलीस महानिरिक्षक सुनील रामनंद यांनी गेल्या आठवड्यात शनिवारी नगरला भेट देत जाबजबाब घेतले आहेत. पांगरमला जावून रुग्णांची विचारपूसही केली. ज्या ठिकाणी बनावट दारू तयार करून तिचे वितरण सुरू होते, जिल्हा रुग्णालयातील उपहारगृहाला त्यांनी भेट दिली होती.

LEAVE A REPLY

*