पवित्र उरूससाठी शहरातून हजारो भाविक अजमेरकडे रवाना

0

जुने नाशिक (फारूक पठाण) : पवित्र अजमेर शरीफ येथील ख्वॉजा गरीब नवाज यांच्या पवित्र उरूस शरीफ निमित्त नाशिकमधून हजारो भाविक रवाना झाले आहेत. येत्यात 4 एप्रिल रोजी पवित्र छट्टी शरीफचा मोठा सण मुस्लिम बांधव साजरा करणार आहे. यानिमित्त शहरातील मुस्लिम बहुल भागात सजावट करण्यात येत आहे. सर्वधर्मीयांना खिरचे वाटप देखील होणार आहे.

‘हिंद के राजा’ म्हणून प्रसिध्द ख्वाजा गरीब नवाज यांचा वार्षीस उरूस अरबी रज्जब महिन्याच्या 6 तारखेला साजरा होता. 30 मार्च रोजी 1 रज्जब राहणार आहे. यानूसार 4 एप्रिल रोजी पवित्र छट्टी शरीफचा सण मुस्लिम बांधव साजरा करणार आहे.

राजस्थान येथे ख्वॉजा गरीब नवाज बाबा यांचा पवित्र मजार शरीफ असून सर्वधर्मीय भाविक नियमीत येथे जातात, तर वार्षीक मेळाव्यात जगभरातून भाविक येतात.

नाशिकमधून देखील हजारो भाविक रवाना झाले असून जाण्याचा सिलसिला सुरूच आहे. खडकाळी भागातील सलिम खान ग्रुपच्या वतीने विशेष बस गाड्यांची सोय भाविकांसाठी करण्यात आली होती. हे गाड्यात 25 मार्च रोजी रवाना देखील झाले आहे.

त्याच प्रमाणे रेल्वे, बस तसेच खाजगी वाहनांमध्ये भाविक सतत जात आहे. दरम्यान शहरात देखील छट्टी शरीफ निमित्त धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जुने नाशिक परीसरातील अनेक चौक, मोहल्ल्यांमध्ये सजावट करण्यात येत आहे.

मशिदी, दर्गा शरीफसह मुस्लिम बांधव घरे व दुकानांवर विद्युत रोषणाई करीत आहे. विविध मंडळांच्या वतीने सर्वधर्मीयांसाठी खिर वाटपचा कार्यक्रम देखील होणार आहे.

LEAVE A REPLY

*