पवार भेटले सोनियांना; राष्ट्रपतीपदासाठी सर्व विरोधीपक्ष एकवटणार

0

नवी दिल्ली, ता. ३ : राष्ट्रपतीपदाच्या येऊ घातलेल्या निवडणूकीत सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन सत्ताधारी भाजपा विरोधात राष्ट्रपतीपदाचा उमेदवार देणार असल्याचे समजते.

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी २६ एप्रिल रोजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली असून त्यानंतर राजकारण गतीमान झाल्याचे मानले जात आहे.

सोनिया गांधींनी राष्ट्रपतीपदाचा संयुक्त उमेदवार ठरविण्यासाठी पुढाकार घेतला असून यासंदर्भात मुलायमसिंग आणि मायावती यांच्यासोबत चर्चाही केली आहे.

दरम्यान काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हेही लवकरच मायावती आणि ममता बॅनर्जी यांच्यासोबत चर्चा करणार आहेत.

LEAVE A REPLY

*