Type to search

धुळे

पळासनेर येथे बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त

Share

धुळे । पळासनेर ता. शिरपूर येथे बनावट दारूचा कारखाना शिरपूर तालुका पोलिसांनी उद्ध्वस्त केला असून या ठिकाणाहून 61 हजार 124 रूपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला असून शिरपूर पोलीस ठाण्यात संशयिता विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

शिरपूर तालुका पोलिसांना पळासनेर येथे भीमा गुलाब भिल याच्या घरात बनावट दारू तयार केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे दि. 11 ऑगस्ट रोजी रात्री एक वाजता पथकाने सापळा लावून भीमा भिल याच्या घराची झडती घेतली. त्यावेळी दोनशे लिटर व 35 लिटरच्य टाक्यांमध्ये स्पिरीट भरलेले आढळून आले. तसेच बनावट दारूच्या बॉटल आणि बनावट दारू तयार करण्यासाठी उपयोगी पडणारे मशीन, कागदी लेबल, सुगंधी द्रव्य, रंग, विविध कंपनींच्या नावाच्या खाली दारूच्या बाटल्या, बुच, खोके तसेच दारू तयार करण्यासाठी उपयोगी पडणारे साहित्य तेथे आढळून आले. पोलिसांनी त्या ठिकाणाहून 61 हजार 124 रूपयांचा मुद्ेमाल जप्त करण्यात आला.

सदर कारवाई सुरू असतांना अंधाराचा फायदा घेवून भीमा गुलाब भिल हा पळुन गेला. याबाबत उपनिरीक्षक दिलीप बाविस्कर यांनी शिरपूर पोलिसात फिर्याद दिली. भांदवि 328, 420, 468, 486, 488 सह 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार, दिपक वारे, दिलीप बाविस्कर, पोना संजीव जाधव, योगेश दाभाडे, योगेश मोरे, भुषण चौधरी, रविंद्र महाले, राजु गिते यांच्या पथकाने केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!