परदेशातून परतलेल्या मुलाला घरात आढळला आईचा मृतदेह

0

मुंबईमधील अंधेरी येथील लोखंडवाला परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली.

परदेशात असलेले ऋतुराज साहनी आपल्या ओशिवरा येथील घरी परतले. फ्लॅटच्या दाराशी आल्यानंतर त्यांनी दार ठोठावले. मात्र, बराच काळ आतून त्यांना कोणीही प्रतिसाद दिला नाही. अखेर ऋतुराज यांनी बनावट चावीच्या सहाय्याने दार उघडून घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना फ्लॅटच्या बेडरूममध्ये त्यांना आपल्या ६३ वर्षीय आईच्या शरीराचा सांगाडा दृष्टीस पडला.

त्यांनी पोलिसांना याबद्दल कळवले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन हा सांगाडा ताब्यात घेतला. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार ऋतुराज साहनी यांच्या आईचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला असावा.

मात्र, तेव्हापासून हा मृतदेह तसाच पडून राहिल्याने त्यावरील मांस झडून जाऊन सांगाडाच शिल्लक राहिला असावा. घराचे दार आतूनच बंद होते. याशिवाय, सांगाड्यावर कुठेही दुखापतीच्या खुणा आढळून न आल्यामुळे त्यांचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

 

LEAVE A REPLY

*