Type to search

जळगाव

पद्मालय मंदिराला झुंबराची नवी झळाळी; गाभार्‍याचे रुपडे पालटले

Share

जळगाव । जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील प्राचीन स्वयंभू गणेश मंदिर असलेले पांडवकालीन गणपती मंदिरात इटालियन पध्दतीने झुंबर नुकतेच बसवण्यात आले. या झुंबरामुळे मंदिर परिसरातील शोभा वाढली असून झुंबरामुळे मंदिराला नवी झळाळी मिळाली आहे.

जिल्ह्यासह विविध ठिकाणच्या भाविकांचे श्रध्दास्थान असलेले पद्मालय येथील गणपती मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या परवानगीनुसार व मंदिराचे पुजारी गणेश लंबोधर वैद्य महाराज यांच्या सूचनेनुसार बीजबजारसारख्या मोठ्या व्यावसायिक मॉल चालवित असलेल्या फ्युचर ग्रुपचे लोकपाल ऑफिसर तथा किर्गीस्थान या देशाचे राजनैतिक अधिकारी देवेंद्र साळी यांनी स्वखर्चातून हे झुंबर बसविले आहे. झुंबरामुळे अतिप्राचीन अशा गणपती मंदिराची शोभा वाढली असून मंदिराला नवीन झळाळी मिळाली आहे. मंदिरात बसविण्यात आलेले इटालियन पध्दतीचे क्रीस्टन स्टाईल झुंबर हे सुमारे 1 लाख, 50 हजार रुपये आहे. या झुंबरावर कोरीव नक्षीकाम देखील आहे. झुंबर बसविण्याचा कार्यक्रम शनिवार भाविकांच्या उपस्थितीत पद्मालय येथे पार पडला. दरम्यान यावेळी देवेंद्र साळी यांच्यासह भाविक तसेच परिसरातील मान्यवर उपस्थित होते. दरम्यान झुंबर बसविण्यासाठी लागणारे कारागीरही मुंबईवरुन बोलविण्यात आले होते.

असा आहे मंदिराचा इतिहास…
जळगाव शहरापासून सुमारे 30 किमी अंतरावर असलेल्या पद्मालय या शब्दाची फोड पद्म +आलय असा आहे. या दोन शब्दांचा मिलाफ म्हणजे पद्मालय. संस्कृत म्हणजे या शब्दाचा अर्थ कमळाचे घर असा होतो. या मंदिराच्या जवळ असलेला कमळ तलाव हा गणेशाला समर्पित आहे. पद्मालय मंदिर हे भारतातील अडीच गणपती पिठांपैकी एक आहे. हे मंदिर अर्ध पीठ म्हणून सन्मानित आहे. मंदिरात दोन स्वयंभू गणेशमूर्ती आहेत. अमोद आणि प्रमोद या दोन्ही मूर्तीमध्ये प्रवार आहेत. यातील एका मूर्तीची सोंड उजवीकडे तर दुसर्‍या मूर्तीची सोंड डावीकडे आहे. या दोन्ही मूर्त्या स्वयंभू आहेत, अशी आख्यायिका सांगितली जाते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!