पदाधिकार्‍यांसमोर प्रशासनाची माघार

0

जिल्हा परिषद  : स्वीय साहय्यक सूचवण्याचे अधिकार दिले सभापतींना

 

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्रशासनाने काही दिवसंापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांचे कार्यालय वगळून, उपाध्यक्षा राजश्री घुले आणि अन्य चार विषय समित्यांचे सभापती यांच्या कार्यालयातील स्वीय साहय्यक आणि शिपाई कर्मचारी बदले होते. यामुळे पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. अखेर अध्यक्षा विखे यांनी याप्रकरणात लक्ष घातल्याने प्रशासनाने माघार घेतली आहे. आता उपाध्यक्षासह चारही विषय समिती सभापती यांना त्यांच्या सोईचे स्वीय साहय्यक आणि शिपाई सूचवण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

 
जिल्हा परिषदेत पदाधिकारी यांना त्यांच्या कामाच्या सोईच्यादृीने स्वीय सहाय्यक आणि शिपाई यांची नियुक्ती करण्याची परंपरा होती. या मात्र, त्या परंपरेला यंदा जिल्हा परिषद प्रशासनाने छेद देत विद्यमान स्वीय सहाय्यकांच्या बदल्या दुसर्‍या विभागात परस्पर करण्यात आल्या होत्या. हे करत असताना अध्यक्षा विखे यंाच्या कार्यालयातील स्वीय सहाय्यक तसेच ठेवण्यात आले होते. अचानक स्वीय सहाय्यक आणि शिपाई बदल्याने उपाध्यक्ष आणि चारही विषय समित्यांच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तर अध्यक्षा विखे यंानी हा वाद घरातील असून तो चर्चेेतून सोडवणार असल्याचे स्पष्ट केले होते.

 
त्यानुसार प्रशासनाने आता माघार घेतली आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत उपाध्यक्ष, समाज कल्याण समिती आणि महिला बालकल्याण समितीकडून स्वीय साहय्यकांची नावे सामान्य प्रशासन विभागाला पाठवण्यात आली होती. कृषी आणि बांधकाम समितीच्या सभापतींकडून त्यांच्या स्वीय साहय्यक आणि शिपाईपदाच्या कर्मचार्‍यांची नावे आल्यानंतर नेमणुकीची फाईल मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आली.

 

 दरम्यान, प्रशासनाने परस्पर बदली करण्यात आलेल्या स्वीय साहय्यक आणि शिपाई त्यांच्यामुळे कामाच्या ठिकाणावर कार्यरत राहण्याच्या आदेशाची वाट पाहत आहे. पदाधिकार्‍यांनी मागणी केलेल्यामध्ये दोन ठिकाणी नव्याने दुसर्‍या कर्मचार्‍यांची स्वीय सहाय्यक पदासाठी मागणी नोंदविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*