Type to search

क्रीडा नंदुरबार

पथराई येथे आजपासून राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धा

Share

नंदुरबार । तालुक्यातील पथराई येथील के.डी.गावीत शैक्षणिक व क्रीडा संकुलात सप्टेंबर महिन्यात झालेल्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेनंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्र स्केटिंग असोसिएशन, नंदुरबार जिल्हा हौशी रोलर स्केटींग असोसिएशन व आदिवासी देवमोगरा एज्यूकेशन सोसायटी नटावद यांच्या संयुक्त विद्यमाने 30 व्या राज्यस्तरीय रोलर स्केटींग स्पीड स्पर्धा 2019-20 चे यजमानपदही के.डी.गावीत शैक्षणिक संकुलास मिळाले आहे. ही स्पर्धा दि.14 ते 23 नोव्हेंबर 2019 या कालावधीत होणार आहे.

आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे के.डी.गावीत शैक्षणिक व क्रीडा संकुल, पथराई येथे सलग पाचव्यांदा राज्यस्तरीय रोलर स्केटींग स्पीड स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्रभरातील विविध वयोगटातील स्पर्धक सहभागी होणार आहेत. दि.14 नोव्हेंबर रोजी येणार्‍या स्पर्धकांची नावनोंदणी व सराव सत्र होतील. स्पर्धेचे उद्घाटन दि.15 नोव्हें. रोजी राज्य असोसिएशनचे अध्यक्ष पी.के.सिंग, सचिव ज्ञानेश्वर बुलंगे, सौ.बुलंगे, जिल्हा स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष तथा आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्रकुमार गावीत, प्रशासकिय अधिकारी देविदास बोरसे, कार्यालयीन अधिक्षक भिमसिंग वळवी, जिल्हा स्केटिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष भगुराव जाधव, सचिव नंदु पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेत तब्बल 1000 पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी होत आहेत. मुले-मुली यांचा 7 ते 9, 9 ते 11, 11 ते 17, 17 ते 30 व 30 पेक्षा अधिक असा वय वर्षे वयोगट असणार आहेत. रोलर, हॉकी इनलाईन, स्क्वाड, स्केटबॉर्ड, डर्बी विविध 15 खेळप्रकारांचा समावेश असून स्पर्धा सलग 10 दिवस चालणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेतून विशाखापट्टणम येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ निवडला जाणार आहे.

या स्पर्धेत 36 जिल्ह्यातील 7 ते 30 वर्षे या वयोगटाचे 1000 पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. स्पर्धकांसह प्रशिक्षक व पालकही येत असल्याने महाराष्ट्रभरातून येणार्‍यांची संख्या दुप्पटीने वाढण्याची शक्यता आहे. सहभागी स्पर्धकांसह त्यांचे प्रशिक्षक व पालकांना कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये; यासाठी बैठक घेण्यात आली. बैठकीत राजेंद्रकुमार गावीत म्हणाले की, आतापर्यंत झालेल्या चार स्पर्धांमध्ये थोड्याफार प्रमाणात ज्या अडचणी किंवा समस्या होत्या,  त्या यावेळी येणार नाहीत व स्पर्धकाला कुठल्याही अडचणीला सामोरे जावे लागणार नाही, याची पुरेपुर काळजी घेतली जाणार आहे. त्यानुसार समित्या गठीत करण्यात आल्या असून कामनिहाय जबाबदार्‍या सोपविण्यात आल्या आहेत. बैठकीत प्रशासकिय अधिकारी देविदास बोरसे, कार्यालयीन अधिक्षक भिमसिंग वळवी, जिल्हा स्केटिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष बी.डी.जाधव, विठ्ठल मराठे आदी उपस्थित होते.

स्पर्धेची वैशिष्ट्ये

*36 जिल्ह्यातील 1000 स्केटर होणार सहभागी.

* विशाखापट्टनम येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडचाचणी.

* रोलर स्केटींग स्पीडच्या सर्व क्रिडाप्रकारांचा समावेश.

* नंदुरबारला सलग पाचव्यांदा स्पर्धेचे आयोजन.

*महाराष्ट्रातील नामांकित स्केटींग ट्रॅकपैकी एक

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!