Type to search

maharashtra नंदुरबार

पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीची आत्महत्त्या

Share
नंदुरबार । पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याची घटना विरपूर ता.अक्कलकुवा येथे घडली. याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरपूर ता.अक्कलकुवा येथील मालती केसरसिंग पाडवी (वय 34) हीना तीचा पती केसरसिंग भागा पाडवी हा दोन वर्षापासून दारु पिवून मारहाण करत होता.

दि. 14 मे रोजीदेखील त्याने पत्नीला मारहाण केल्याने ती माहेरी आली. दि. 15 मे रोजी केसरसिंग हा तीच्या माहेरी येवून तु सारखी भावाकडे आलीस तर तुला मारुन टाकेल अशी धमकी देवून माहेरुन विरपूर येथे तीला घेवून आला. तेथेही तिला त्रास देत असल्याने मालती पाडवी हिने विषारी द्रव्य पिवून आत्महत्या केली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी भेट दिली. याबाबत अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!