पटेल शैक्षणिक संकुलाचे सीईटीत सुयश

0
शिरपूर / आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाच्या विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. आर.सी.पटेल विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा विनीत पांडुरंग पाटील याने पीसीएम गृपमध्ये 153 गुण मिळवून संस्थेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.39 विद्यार्थ्यांनी 100 पेक्षा जास्त गुण मिळविले.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल व संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांच्या हस्ते जनक विला आमदार कार्यालय येथे करण्यात आला.

याप्रसंगी उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संस्थेचे सीईओ डॉ.उमेश शर्मा, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील, प्राचार्य पी.व्ही.पाटील, प्राचार्या सौ. एम. एस. अग्रवाल, प्राचार्य रवि बेलाडकर, आयआयटी पॉईंटच्या ब्रांच समन्वयिका संगिनी अपरांती, गजानन सोनवणे, सर्व शिक्षक उपस्थित होते.

शिरपूर आर.सी.पटेल विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील 19 विद्यार्थ्यांनी 100 पेक्षा जास्त गुण प्राप्त केले. विनीत पांडुरंग पाटील याने पीसीएम गृपमध्ये 153 गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला असून पीसीबी गृपमध्ये 128 गुण मिळविले.

 

LEAVE A REPLY

*