पटेल प्राथमिक शाळेत शिक्षक दिन साजरा

0

शिरपूर । आर. सी.पटेल प्राथमिक शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा झाला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्ताने विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

तिसरी, चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडली व शिकविण्याच्या आनंद घेतला. शिक्षकांचे कामकाज काय काय असते त्याचे स्वरूप समजून घेतले. त्यांना आज हा आगळावेगळा अनुभव मिळाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. वंदना भंडारी या होत्या. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सौ. शारदा भंडारी, सौ. मीनाक्षी राठी, सौ. राखी अग्रवाल, सौ. उमेहानी बोहरी, सौ. शुभांगी राठी, सौ. शशी भंडारी, मुख्याध्यापिका सौ. क्रांती जाधव उपस्थित होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. कार्यक्रमात पूरग्रस्तांना मदत म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी पैसे जमा केले त्या विद्यार्थ्यांचा व ज्यांनी शिक्षकांची भूमिका साकार केली त्यांचा सत्कार करण्यात आला.

त्यानंतर शिक्षक बंधू भगिनींचा सत्कार करून बदली होऊन आलेले शिक्षक रविंद्र पवार व सौ. हर्षदा भावसार यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी दिवसभर अनुभवलेले अनुभव तर सौ. राजेश्वरी ढिवरे यांनी शिक्षकांची भूमिका काय असते ते आपल्या मनोगतात सांगितले. तसेच सौ. मीनाक्षी राठी व सौ. वंदना भंडारी यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाखेच्या मुख्याध्यापक सौ. क्रांती जाधव शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*