Type to search

जळगाव

पक्षी सप्ताहानिमित्त गौताळ्यात बर्ड कॉल रेकॉर्डिंग, निरीक्षण

Share

जळगाव । ज्येष्ठ पक्षी अभ्यासक मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिवस 5 नोव्हेंबर आणि  थोर पक्षी तज्ज्ञ स्व.डॉ.सलीम अली यांची जयंती 12 नोव्हेंबर रोजी असल्याने पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त गौताळा अभयारण्यात  बर्ड कॉल रेकॉर्डिंग व पक्षीनिरीक्षण करण्यात आले. तसेच  जळगाव येथील मेहरूण तलाव आणि भुसावळ येथील अष्टभुजा चौक व म्हाडा कॉलनीत ‘परिसरातील पक्षी’ हे पोस्टर प्रदर्शन निसर्गमित्रतर्फे लावण्यात आले होते, अशी माहिती पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी दिली.

या थोर अभ्यासकांच्या जयंतीनिमित्त पक्षी सप्ताह साजरा करण्याचे आवाहन महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेने केले होते. या आवाहनाचे  औचित्य साधून निसर्ग मित्र जळगावतर्फे ममुराबाद रोड व अजिंठा येथे पक्षीनिरीक्षण करण्यात आले.  गौताळा वन्यजीव अभयारण्य, औरंगाबाद येथे  तीन दिवस  पक्षीनिरीक्षण व किलबिल ध्वनिमुद्रीत करण्यात आले. या तीन दिवसात पक्ष्यांच्या एकूण 66 जातींची नोंद झाली. यात मुख्यतः गवताळ, माळरानावरील आणि वृक्षनिवासी जातीच्या पक्ष्यांची संख्या अधिक होती. पाणथळ पक्षी अल्प आढळले. यासाठी सांगलीचे पक्षी आवाज तज्ज्ञ व अभ्यासक शरद आपटे यांनी मार्गदर्शन केले.

या वेळी टकाचोर, ठिपकेवाला कवडा,पीतकंठी चिमणी आणि भारतीय रातवा व अन्य  पक्ष्यांचा आवाज रेकॉर्ड करण्यात आला. येथील पक्षी वैभवही समृद्ध असल्याचे मत पक्षीमित्र  शरद आपटे यांनी व्यक्त केले. पक्षी सप्ताहातील आणखी एक उपक्रम म्हणून म्हणून पोस्टरच्या माध्यमातून पक्ष्यांची ओळख, पक्ष्यांचे अधिवास, त्यांचे संवर्धन आणि त्यांचे जैवविविधतेतील महत्वाचे स्थान याविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशान जळगाव येथील मेहरुण तलावावर दुपारी 4 ते 6.30 या वेळात ‘परिसरातील पक्षी’ हे पोस्टर प्रदर्शन झाले.

या प्रदर्शनासाठी यासाठी हरीश जयस्वाल, रेहान शेख गफ्फार, संकल्प सोनावणे व जय सोनार यांनी सहकार्य केले. भुसावळ येथील अष्टभुजा चौकात व लिटील फ्लॉवर्स फन स्कूल, म्हाडा कॉलनी रोड येथेही  पोस्टर प्रदर्शन झाले. यशस्वितेसाठी मयुरा खरे, अनिकेत खरे, तत्पर फाउंडेशनचे सादिक पिंजारी,न.पा.कर्मचारी नगीन दत्तू सोनार, टी.सी.राज बारसे,युवराज कुरकुरे,संजय अहिरराव,संजीवनी यावलकर,क्रुतूजा यावलकर,श्रीयोग मुळे,संजय यावलकर यांचे सहकार्य लाभले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!