पंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित

0
नवी दिल्ली । भारताच्या विश्वचषक संघात ऋषभ पंतचा समावेश करण्यात आला नसल्याने आश्चर्याचा धक्का बसल्याची प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉँटिंग याने व्यक्त केली आहे. भारतीय निवड समितीने पंतऐवजी दिनेश कार्तिकची निवड केली.

या पाश्र्वभूमीवर पाँटिंग म्हणाला, “पंतला भारतीय संघात न घेतल्याने मी आश्चर्यचकित झालो आहे. तो भारताच्या 11 जणांच्या संघात मला हवाच होता. त्याच्यासारखा फलंदाज चौथ्या किंवा पाचव्या जागेवर भारतासाठी हुकमी एक्का ठरू शकला असता. मात्र, त्याची भारतीय संघात निवड होऊ शकली नाही, हे माझ्यासह अनेकांसाठी धक्कादायक आहे. ” दिल्ली कॅपिटल्स संघाचा यष्टिरक्षक-फलंदाजीची जबाबदारी समर्थपणे सांभाळणार्‍या पंतला प्रोत्साहन देण्याशिवाय आपल्या हाती काहीच नसल्याचेही पॉँटिंगने नमूद केले. विश्वचषकासाठी पंतला डावलून दिनेश कार्तिकला भारतीय संघात स्थान दिले आहे. त्यामुळे आपले नैराश्य झटकून पंतला फलंदाजी करावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

*