पंतप्रधान मोदींच्या हस्ते कोची मेट्रोचे उद्घाटन

0

केरळमधील पहिल्या मेट्रो रेल्वेचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

मोदी यानी यावेळी पलारिवट्टम रेल्वे स्थानकापासून पथादिपल्लम स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास केला.

ऑगस्टमध्ये ही सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरु करण्याता येईल.

उद्घाटन समारंभ जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये झाला.

पंतप्रधान मोदींसोबत मेट्रो मॅन ई. श्रीधरनही यावेळी उपस्थित हाेते. यापुर्वी त्यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत नव्हते ज्यावर विरोध पक्षांनी आक्षेप नोंदविला होता. कोची मेट्रोच्या एमडींनी याबाबत म्हटले होते की अंतिम यादी पीएमओने तयार केली होती.

LEAVE A REPLY

*