पंढरपूरवारीसाठी एसटीकडून 250 गाड्या

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- यंदा आषाढी वारीसाठी पंढरपुरसाठी एसटी महामंडळाकडून 250 गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती महामंडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयाकडून देण्यात आली. गेल्यावर्षी नगर जिल्ह्यातून एसटी महांडळाने ऐवढ्याच गाड्याचे नियोजन केले होते. मात्र, धुळे आणि जळगाव येथून अतिरिक्त गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते.

 

 

दरवर्षी नगरसह राज्यातून आषाढी वारीसाठी पंढरपूर वारीला जाणार्‍या वारकर्‍यांची संख्या मोठी असते. यासाठी एसटी महामंडळाकडून प्रत्येक जिल्ह्यातून स्वतंत्रपणे नियोजन करण्यात येते. नगरच्या एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयाकडून हे नियोजन करण्यात आले आहे. यंदा नगर जिल्ह्यातून एसटी महामंडळाकडून पंढरपूर यात्रा कालावधीत 30 जून ते 10 जुलै असा निश्‍चित करण्यात आला आहे. यात मंगळवार 4 जुलैला आषाढी एकादशी आहे. बहुसंख्य वारकरी व्दादशीच्या दिवशी परतीच्या प्रवासाला लागतात. त्यामुळे 5 जुलैपासून पंढरपुरकडून नगरकडे बस धावणार आहेत.

 

 

पंढरपुरकडे शुक्रवार 30 जूनपासून टप्प्या टप्प्याने एसटी महामंडाळाच्या बस रवाना झाल्या आहेत. 30 जून ते 5 जुलै दरम्यान माळीवाडा बस स्थानक येथून पंढरपूर यात्रा वाहतूक करण्यात येणार आहे.

 

त्या पार्श्‍वभूमीवर विशेष यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. त्यात बस स्थानकावर मंडळ, अतिरिक्त वीजेची व्यवस्था आणि अन्य सुविधा देण्यात आल्या आहेत. पंढरपुरपासून अलिकडे असणार्‍या विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे नगरच्या वारकर्‍यांसाठी यात्रा केंद्र उभारण्यात आले आहे. पंढरपूर ते यात्रा केंद्र हा प्रवास करण्यासाठी शटल बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

 

जिल्ह्यातील नेवासा, श्रीरामपुर, कोपरगाव, अकोले, संगमनेर, पारनेर आदी आगारातून पंढरपूरसाठी शहरातील माळीवाडा बस स्थानकावरून वाहतूक करणार आहेत. शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा, जामखेड आदी आगाराच्या बससे संबंधी आगातून माहिजळ मार्गे पंढरपुरला जाणार आहेत. त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

 

 

आगारनिहाय एसटी बस
तारकपूर 30, संगमनेर, श्रीरामपुर, कोपरगाव, जामखेड, श्रीगोंदा प्रत्येकी 25, शेवगाव, पारनेर, नेवासा, पाथर्डी प्रत्येकी 20, अकोले 15 अशा 250 एसटी बसचे नियोजन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*