पंजाबची मुंबईवर 7 धावांनी मात; प्लेऑफचे आव्हान कायम

0
अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने मुंबई इंडियन्सला ७ धावांनी पराभूत करून प्लेऑफचे आव्हान कायम ठेवले.
पंजाबने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद २३० धावा काढल्या.
प्रत्युत्तरात मुंबईने २० षटकांत ६ बाद २२३ धावा काढून झंुज दिली. मुंबईला अखेरच्या षटकांत विजयासाठी ६ चेंडूंत १६ धावांची गरज होती. या षटकात मोहित शर्माने १,६,०,०,०,१ अशा एकूण ८ धावा देऊन पंजाबचा विजय निश्चित केला. या सामन्यानंतर १४ गुण झाले आहेत. सामन्यात दोन्ही संघांकडून एकूण ४५३ धावांचा पाऊस पडला. यात ३६ चौकार आणि २६ षटकार बरसले.
धावांचा पाठलाग करताना मुंबईकडून सलामीवीर सिमन्सने ३२ चेंडूंत ५९ धावा, पार्थिवने २३ चेंडूंत ३८ धावा आणि पोलार्डने २४ चंेडूंत नाबाद ५० धावा काढल्या. इतरांनी निराशा केली.

LEAVE A REPLY

*