पंचवटी डेपोत सिटी बस वाहन परीक्षक कॅबिनला जाऊन धडकली ; ४ जखमी

0

नाशिक : पंचवटी डेपो क्रमांक २ मध्ये सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने सिटी बस वाहन परीक्षकांच्या कॅबीनला जाऊन धडकली. या अपघातात वाहन परीक्षक यांच्यासह अन्य तिघे जखमी झाले आहेत.

जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाहन परीक्षक यांच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे तर इतर तिघे किरकोळ जखमी असल्याची माहिती प्रतिनिधीकडून प्राप्त होते आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास बस क्रमांक MH-१५, AK-८०७१ चालक वळवत असतांना चालकाचा ताबा सुटला आणि सिटी बस वाहन परीक्षांच्या कॅबीनला जाऊन धडकली.

या घटनेत बसचे मोठे नुकसान झाले असून  कॅबीनजवळ उभी असणारी दुचाकीचेही नुकसान झाले. जखमींमध्ये वाहन परीक्षकांचा समावेश असून त्यांचे नाव ए. डी. राजे असे आहे. तर इतर तिघा जखमींमध्ये कोळी, भास्कर आणि पाटील नामक व्यक्ती असल्याचे प्रतिनिधीकडून समजते.

LEAVE A REPLY

*