पंचवटीत सशस्त्र हल्ल्यात युवक ठार

0

नाशिक : पंचवटीतील पेठरोडवरील हॉटेल न्यू उत्तम हिरा पॅलेससमोर रात्रीच्या सुमारास मोटारसायकलवरून जाणार्‍या युवकावर मागून येणार्‍या हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार केल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले. घटनेचे वृत्त समजताच पंचवटी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास चक्र फिरवले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

दीपक दगडू आहिरे (25, रा. निलगिरीबाग, विडी कामगारनगर) असे या युवकाचे नाव असून रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दीपक हा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याचा व्यवसाय करतो.

रात्री काम आटपून पेठरोडमार्गे हॉटेल न्यू उत्तम हिरा पॅलेससमोरून आपल्या पल्सर (एम.एच.15 सीएच 6373) गाडीवरून घराकडे जात असताना मागून आलेल्या हल्लेखोरांनी दीपकवर धारदार शस्त्राने पाठीवर सपासप वार केले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दीपकचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर भीतीने परिसरातील दुकाने बंद झाली.

घटनेची माहिती कळताच सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर आदींसह पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास चक्रे फिरवली. घटनेचे कारण अद्याप समजले नसून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

*