Type to search

धुळे

न.एस.पी.पाटील विद्यालयाच्या मुख्याध्यापक कार्यालयाला शाळेच्या पहिला दिवशीच कुलूप

Share

पिंपळनेर । येथील कै. एन.एस.पी.पाटील विद्यालयाच्या मुख्याध्यापक कार्यालयाला शाळेचा पहिला दिवस असूनही कुलूप होते. नवीन मुख्याध्यापकाला  चार्ज न देता माजी मुख्याध्यापकही विद्यालयात आले नाहीत.

येथील कै. एन.एस.पी.पाटील विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून उमेश जयराम पाटील यांची 15 ऑक्टोबर 2019 रोजी नियुक्ती करण्यात होती. त्यावर हरकत घेत सेवा जेष्ठतेनुसार भालचंद्र लाला चव्हाण यांची नियुक्ती दि. 23 ऑक्टोबर 2019 पासून 22 जानेवारी 2020 पर्यंत नियुक्तीपत्र देवून केली. आज दीपवाळीच्या सुटीनंतर शाळेचा पहिला दिवस होता. मुख्याध्यापक भालचंद्र लाला चव्हाण आले असता मुख्याध्यापक कार्यालयाला दोन कुलूप लावलेले आढळले. त्यांनी माजी मुख्याध्यापक यांना फोनद्वारे संपर्क केला. तर आरेरावीची उत्तरे देत मला चार्ज द्यायचा नाही. तुझ्याकडून जे होईल ते करा असा दम देत शाळेतच आले नाही व चार्जसी दिला नाही. या आधीही भालचंद्र चव्हाण यांनी 23 ऑक्टोबर 2019 रोजी नियुक्ती झाल्यानंतर चार्ज घेण्यासाठी वेळोवेळी संपर्क केला मात्र उमेश पाटील यांनी आजपर्यंत चार्ज न देता ऑफीसला कुलूप लावून गेले आहेत. त्यामुळे कार्यालयीन कामकाजाला अडथळे निर्माण होत असल्याचे देशदूत प्रतिनिधींशी बोलतांना चव्हाण यांनी सांगितले. ते आज शाळेच्या पहिल्या दिवशी ही उपस्थित राहीले नाहीत, असे सांगितले. या संबंधात वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचेही सांगितले. दरम्यान याबाबत मुख्याध्यापक उमेश पाटील यांच्याशी संपर्क साधाला असता मी सकाळी शाळेत आलो होते, असे त्यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!