न्हनावेत विवाहीतेसह मुलाचा जळून मृत्यू; संतप्त नातेवाईकांनी केला सासरच्या अंगणात अंत्यविधी

0
चांदवड : न्हनावे (ता. चांदवड) येथील अर्चना ज्ञानेश्वर आहेर (वय 25) या विवाहीतेसह अवघ्या चार महिन्याचा मुलगा प्रणव यांचा राहत्या घरात जळून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना आज सकाळी 11.30 च्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान सदर प्रकार घातपात असल्याचा आरोप मृत विवाहीतेच्या नातेवाईकांनी केला आहे.

दरम्यान रात्री संतप्त झालेल्या मृत महिलेच्या नातेवाईकांनी सासरच्या अंगणात अंत्यविधी केला.

याआधी नवर्‍यासह सासू-सासरे पोलीस ठाण्यात हजर झाले होते. यावरून पोलिसांनी लागलीच घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला होता.

वरील सर्व प्रकाराबाबत मुलीचे वडील मधूकर ठाकरे यांनी मुलगी अर्चना व नातू प्रणव यांचा घातपात झाल्याचा आरोप करीत तिचे पती, सासू-सासरे, नणंद, नंदई यांच्याविरोधात चांदवड पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत रात्री पोलिसांत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. त्यानंतर संताप अनावर झालेल्या नातेवाईकांनी महिलेच्या सासरी जाऊन तेथे अंत्यविधी केल्याने परिसरात तणावाचे वातावरण होते.

LEAVE A REPLY

*