Type to search

क्रीडा

न्यूझीलंडसोबत उद्या लढत

Share

लंडन । भारताचा तिसरा सामना न्यूझीलंडबरोबर गुरुवारी होणार आहे. या सामन्याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना असेल. कारण हे दोन्ही संघ चांगलेच तुल्यबळ आहेत. त्याचबरोबर दोन्ही संघांना आतापर्यंत विश्वचषकात पराभव स्वीकारावा लागलेला नाही. पण भारताला नमवण्यासाठी न्यूझीलंडच्या माजी कर्णधाराने खास प्लॅन आखल्याचे म्हटले जात आहे.

भारताने आतापर्यंत विश्वचषकात दोन सामने खेळले आहेत. पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला सहज पराभूत केले. त्यानंतर दुसर्‍या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने साडेतीनशे धावांचा पल्ला गाठला होता. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. पण आता तिसर्‍या सामन्यात त्यांची गाठ पडणार आहे ती न्यूझीलंडशी. न्यूझीलंडने आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे.

न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हेटोरीने आता भारताविरुद्ध खास प्लॅन आखला आहे. व्हेटोरी हा आयपीएलमध्ये खेळला होता. त्याचबरोबर आता तो प्रशिक्षणही देत आहे. मुख्य गोष्ट म्हणजे आयपीएलमधील विराट कोहलीच्या आरसीबीमधूनच व्हेटोरी खेळला होता. त्यामुळे कोहलीचे कच्चे दुवे व्हेटोरीला चांगलेच माहिती असल्याचे बोलले जात आहे.

व्हेटोरीने न्यूझीलंडच्या संघाला सांगितले की, भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांमध्ये गुणवान खेळाडू आहेत. त्यामुळे हा सामना चांगलाच अटीतटीचा होऊ शकतो. जर न्यूझीलंडच्या संघाने दडपण योग्य पद्धतीने हाताळले तर त्यांना भारतावर विजय मिळवता येऊ शकतो.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!