न्यूझीलंडने केला महिला संघाचा दोन धावांनी पराभव

0
हेल्मिटन । न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्‍या टी20 सामन्यात स्मृती मानधनाच्या अर्धशतकी खेळीनंतरही भारताचा 2 धावांनी पराभव झाला. यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत 3-0 ने पराभूत होण्याची नामुष्की भारतावर ओढवली. स्मृती आणि मिताली राज मैदानात असेपर्यंत भारताला विजयाच्या आशा होत्या. मात्र,तिला सोफी डिव्हाइनने बाद केले. स्मृती मानधनाने 62 चेंडूत 86 धावा केल्या.

मिताली राज 24 धावांवर नाबाद राहिली. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर या सामन्यातही अपयशी ठरली. ती अवघ्या 2 धावांवर बाद झाली. तर सलामीची फलंदाज प्रिया पुनियाला एकच धाव काढता आली. जेमी रॉड्रीग्जने 21 धावा करून स्मृती मानधनाला साथ दिली.

तत्पूर्वी, भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसर्‍या टी20 सामन्यात न्यूझीलंडच्या महिला संघाने 20 षटकांत 7 बाद 161 धावा केल्या. सलामीची फलंदाज सोफी डिव्हाइनच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतासमोर 162 धावांचे आव्हान उभा केलं. अ‍ॅमी सॅथर्टवेट 30 धावा, सुएझ बेटसने 24 धावा केल्या.

भारताकडून गोलंदाजी करताना अरुंधती रेड्डीने बेटसला बाद करून पहिलं यश मिळवून दिलं. तर पूनम यादवने रोवला बाद करत न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. त्यानंतर सोफी आणि अ‍ॅमीने फटकेबाजी केल्याने संघाला 150 धावांचा टप्पा ओलांडता आला. सोफिला (72 धावा) मानसी जोशीने तर अ‍ॅमीला (31 धावा) राधा यादवने बाद केले. केटी मार्टिन 8 धावांवर धावबाद झाली. शेवटच्या षटकात कॅस्परेक आणि तहुहुला दिप्ती शर्माने बाद केले.

न्यूझीलंडविरुद्ध तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत पहिले दोन्ही सामने गमावल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ तिसरा सामना जिंकून क्लीनस्विप टाळण्याचा प्रयत्न करेल. आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने फलंदाजीचा निर्णय घेतला. गेल्या दोन सामन्यात बाहेर असलेल्या मिताली राजला या सामन्यात संधी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*