Type to search

न्यूक्लिअर कार्डिओलॉजीक

आरोग्यदूत

न्यूक्लिअर कार्डिओलॉजीक

Share
न्यूक्लिअर कार्डिओलॉजीक या चाचणीमधून आपल्या स्ट्रेस टेस्टपेक्षा जास्त चांगली माहिती मिळते. पण या तपासणीसाठी लागणारा वेळ व ती महागडी असल्यामुळे काही ठराविक रुग्णांमध्ये याचा फार चांगला उपयोग होऊ शकतो.

जर तुमची स्ट्रेस टेस्ट फॉल्स पॉझिटिव्ह (हृदयाचा रक्त पुरवठा चांगला असताना विद्युत आलेखनात दोष आढळणे) म्हणजेच पेशंटच्या हृदयविद्युत आलेखनात एस.टी.टी. मध्ये बरेच बदल आढळतात. पण पेशंटला दम किंवा छातीत दुखून येत नाही व त्याच्या शारीरिक तपासणीवरून त्याला हृदयाचा रक्तपुरवठा चांगला असण्याची शक्यता असते. अशा रुग्णात अँजिओग्राफी न करता न्यूक्लिअर स्कॅनद्वारे रक्त वाहिन्यातील दोष कळू शकतात. ज्या रुग्णामध्ये हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे.

कोणतीही गुंतागुंत न होता तो चांगला असेल तर किंवा कोणताही त्रास पुढील विश्रांतीच्या काळात झाला नाही तर थॅलियम तपासणी आपल्याला हृदयाच्या रक्त पुरवठ्याची माहिी व जरूरीप्रमाणे अँजिओप्लास्टी किंवा बायपास शस्त्रक्रिया गरजेची आहे का हे सांगू शकते. अँजिओग्राफीमध्ये अडथळा खरोखरच महत्त्वपूर्ण म्हणजेच 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे का नाही म्हणजेच रक्तपुरवठा सुरळीत आहे का हे कळू शकते व अँजिओप्लास्टी करणे गरजेचे आहे. हा निष्कर्ष त्यातून मिळू शकतो. त्याचप्रमाणे हृदयविकाराचा मोठा झटका येऊन गेल्यावर हृदयाच्या स्नायूपेशी जिवंत आहेत का मृत याची माहिती व त्यानुसार अँजिओप्लास्टी जरूरीची आहे का नाही, हे ठरवण्यास मदत होते.

न्यूक्लिअर स्कॅन आपल्याला अप्रत्यक्षरित्या हृदयाच्या रक्त पुरवठ्याबद्दल माहिती हृदयाच्या स्नायूपेशीवर होणार्‍या बदलावरून आपल्याला देतो. म्हणूनच आजही हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील दोष निदान करण्यासाठी अँजिओग्राफीच आपल्याला 100 टक्के खात्रीलायक माहिती मिळण्यास मदत करते.

फुफ्फुसाचा रक्तपुरवठा – जेव्हा फुफ्फुसाच्या रक्त पुरवठा करणार्‍या वाहिन्यामध्ये रक्त गुठळी अडकून पेशंटला श्वास लागतो किंवा छातीत दुखून येते अशा रुग्णामध्ये प्राणवायू/ रक्ताभिसरण तपासणीत रक्त वाहिनीतील अडथळा दिसून येऊ शकतो. यामध्ये ऊर्जाभरित द्रव शरीरात टोचला जातो. व त्याचवेळेस प्राणवायूमिश्रित ऊर्जाभरीत द्रव दिला जातो. त्यातील निघणार्‍या क्ष-किरणांनी शरीराला कोणतीही इजा होत नाही व ती तशी निर्धोक आहे. विविध आकाराच्या व लांबीच्या नळ्या हृदयातील कप्प्याचे चित्रीकरण किंवा नसांचे चित्रीकरण करताना वापरतात. तपासणी संपल्यावर मांडीतल्या किंवा मनगटातल्या नसेतील छोटी नळी बाहेर काढली जाते.

तेथे 15-20 मिनिटे दाब देऊन तेथील नसेमधील चीर बंद व्हायला मदत होते. त्यानंतर तो भाग निर्जंतुक औषध लावून दाब येणारी पट्टी त्यावर लावतात. त्यानंतर 4 ते 6 तास पाय न हलवता रुग्णाला खाटेवरती झोपवले जाते. आजकाल आता नसबंद करणार्‍या नळीयंत्राचा मांडीपाशी वापर केला जातो. त्यामुळे रुग्ण एका तासात चालू शकतो. अँजिओग्राफी झाल्यावर अर्ध्या तासाने रुग्णास चहा, बिस्किट व त्यानंतर नेहमीप्रमाणे जेवण घ्यायला व जास्त पाणी पिण्यास सांगण्यात येते. जास्त पाण्यामुळे वापरलेला रंगद्रव्य शरीराबाहेर लवकर पडण्यास मदत होते. 6 तासांनी पट्टी बदलली जाते व रुग्णाला चालवून बघितले जाते, नंतर रुग्णालयातून सोडण्यास परवानगी मिळते. रेडिअल नसेतून अँजिओग्राफी केल्यास दोन तासात रुग्णाला घरी पाठविता येते.

कोणत्या रुग्णामद्ये अँजिओग्राफी करतात?
1) स्थिरावस्थेतील हृदयरोग रुग्णामध्ये खालील दोष आढळले तर औषध चालू असताना छातीत दुखणे किंवा दम लागण्याचे प्रमाण वाढणे, पट्ट्याची तपासणीत 6 मिनिटांपेक्षा कमी वेळेत दोष येणे, इकोमध्ये पंपिंग क्षमता 40 टक्क्यांपेक्षा कमी असणे. हृदयाची गती वाढून हृदय बंद पडणे अशी अवस्था एकदा जरी आढळली तर.

2) अस्थिरावस्थेतील हृदयरोग रुग्णामध्ये औषध पूर्ण मात्रेत देऊनही छातीत दुखत राहणे. हृदयाची पंपिंग क्षमता कमी असणे, नाडीचे ठोके अनियमित असणे, रक्तदाब कमी होणे, रक्तातील हृदयासंबंधातील घटक ईन्झाईम्स वाढलेला असणे.

3) हृदयविकाराचा झटका आलेल्या प्रत्येक रुग्णास अँजिओग्राफी करणे महत्त्वाचे ठरते. उपचाराचा फायदा झाला आहे काय किंवा नसांमध्ये अडथळा किती आहे व त्यावरून पुढील उपचार पद्धती ठरवता येते. पुन्हा आजार उद्भवणार का, अँजिओप्लास्टी/ हृदयविकाराचा झटका आल्यानंतर लगेच किंवा आलेल्या रुग्णामध्ये रक्त पातळ करण्याचे व बाकी सर्व औषध पूर्ण मात्रेत दिल्यानंतरसुद्धा छातीत दुखणे, पंपिंग क्षमता कमी असणे, रक्तदाब कमी होणे, अनियमित हृदयगती अशी अवस्था असणे किंवा पडदा फाटला किंवा झडपेमध्ये गळती निर्माण झाली तर…

4) ज्या रुगणांना हृदयविकाराची शक्यता जास्त आहे. पण तपासण्यामध्ये पूर्णपणे निदान झाले नाही.

5) ज्या रुग्णांना पुन्हा पुन्हा छातीत दुखत आहे व तपासण्यामध्ये हृदयविकाराची शक्यता आहे, अशा रुग्णांमध्ये.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!