न्यायालयाचा आदेशाने चोरीस गेलेला मुद्देमाल मुळमालकांना परत

0

जळगाव |  प्रतिनिधी :  शहरातील नवीपेठ व मास्टर कॉलनीतील झालेल्या घरफोडीतील मुद्देमालासाठा एकाला उच्च न्यायालय तर दुसर्‍या जिल्हा न्यायालयात पायपीट करावी लागली. अखेर न्यायालयाच्या आदेशाने हस्तगत करण्यात आलेला १२ लाखाचा मुद्देमाल पोलीस अधिक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते मुळमालकांना परत करण्यात आला.

पोलीस मुख्यालयात मुळ मालक माजी मुख्याध्यापक शेख मोहम्मद इकबाल शेख उस्मान (रा.अक्सानगर), पुष्पा शामसुदंर चक्रवर्ती (वय ८० रा. नवीपेठ) या मूळमालकांसह उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, शहर पोलिस ठाण्याचे प्रदिप ठाकूर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक गंधाले तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोनि. सुनिल कुराडे आदी मान्यवर उपस्थित होते.

नविपेठमधील पुष्पा चक्रवर्ती यांच्या घरात चोरट्यांनी १० जून ते १७ जून २०१६ दरम्यान घरफोडी करत ३०.७ तोळे सोन्याचे दागिने, ११० ग्रॅम चांदीचे दागिने, २ लाख रुपयांची रोकड असा ८ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला होता. हा गुन्हा अवघ्या २४ तासात पोलिस निरीक्षक प्रदिप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखालली सहाय्यक पोलिस निरिक्षक गंधालेव गुन्हे शाखेच्या पोलीसांनी उघडकिस आणला होता. याप्रकरणी आबा सोनवणे, मनोज कोळी, दत्तु पाटील यांच्याकडून २७.२ तोळे वजनाचे सोन्याचे दागीने, १०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, ४ हजार ७०० रुपये किंमतीचा मोबाईल,२० हजार रुपये रोख असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता.

हा मुद्देमाल चक्रवपर्ती यांना परत करण्यात आला. अक्सानगरमधील ऍग्लो उर्दू हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक शेख मोहम्मद इक्बाल शेख उस्मान यांच्या घरात चोरट्यांनी ३ ऑक्टोंबर २०१६ चोरी करीत ४० तोळे सोने व अडीच लाख रूपयांची रोकड लंपास केली होती.

SNS_6814

याप्रकरणी पोनि. सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बागुल यांनी तपास करून मोहसिन शेख उर्फ दत्ता हमीद शेख आणि दोन आरोपीतांकडुन चोरी गेलेल्या सोन्या पैकी २२८.८३ ग्रॅम सोन्याचे लगड व बिस्कीट हस्तगत केले. त्यांनाही न्यायालयाच्या आदेशाने मुद्देमाल परत करण्यात आला.

LEAVE A REPLY

*