न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी विजय मल्ल्या दोषी

0

सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी फरार विजय मल्ल्याला दोषी ठरवण्यात आले आहे.

विजय मल्ल्याने संपत्तीची पूर्ण माहिती न दिल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

१० जुलैपर्यंत न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश विजय मल्ल्याला देण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालय १० जुलैला विजय मल्ल्याला शिक्षा सुनावणार आहे.

न्यायालयाचा अवमान आणि डिएगो व्यवहारातून मिळालेल्या ४० मिलीयन यूएस डॉलरबद्दल निकाल राखून ठेवत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने ९ एप्रिल रोजी म्हटले होते. मल्ल्याला डिएगो करारातून मिळालेले ४० मिलीयन डॉलर सर्वोच्च न्यायालयाने ताब्यात घ्यावेत, अशी मागणी बँकांकडून करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मल्ल्याच्या प्रत्यार्पणात केंद्र सरकारला मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

*