नौदलात साहसी करिअरच्या संधी – व्हॉईस ऍडमिरल सुनील भोकरे

0

जळगाव  प्रतिनिधी :  नौदलाकडे वळणार्‍या तरुणांची संख्या अत्यल्प असून या क्षेत्रात साहसी करियरच्या अनेक संधी उपलब्ध आहे. परंतु याविषयी तरुणांना पुरेशी माहिती नसून तरुणांनी सर्वप्रथम नौदलाविषयी असलेला गैरसमज दूर करुन या क्षेत्राकडे वळले पाहिजे, असा सल्ला भारतीय नौसेनेचे व्हॉईस ऍडमिरल सुनील भोकरे यांनी तरुणांना दिला.

दर्यावरील तुफान लाटांवरही खान्देशी मातीचा गंध कोरणारे जळगाव जिल्ह्याचे भूमिपूत्र व भारतीय नौसेनेची गेल्या तीन दशके सेवा करणारे व्हॉईस ऍडमिरल सुनील भोकरे यांचा आज कांताई सभागृहात जळगावकरांतर्फे नागरी सन्मान करण्यात आला.

DSC_6644

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, माजी कुलगुरु डॉ.के.बी.पाटील,जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, आयुक्त जीवन सोनवणे, जैन इरिगेशनच्या नीशा जैन, एनसीसीचे कमांडर ऑफिसर दिलीप पांडे, केशव स्मृती प्रतिष्ठानचे भरत अमळकर उपस्थित होते.

पुढे बोलतांना भोकरे म्हणाले की, मर्चन्ट नेव्ही व इंडियन नेव्ही यात खुप फरक आहे. इंडियन नेव्हीत काम करतांना अनेक कठीण परिस्थिताचा सामना करावा लागतो परंतु हे सर्व करीत असतांना संपूर्ण जग फिरण्याच्या आनंदही मिळतो.

इंडीयन नेव्हीत पायलट, इंजिनियरर्स, कमांडो, डाईव्हरर्सच्या संधी उपलब्ध आहे. आर्म फॉरर्सची माहिती सांगतांना भोकरे पुढे म्हणाले की, नौसेनेत काम करीत असतांना शिस्त खुप महत्त्वाची असते. अनेक देशांचे सी रुट आपल्या देशातून जातात त्यामुळे संरक्षणाची जबाबदारी नौसेनेवर अधिक आहे.

सुरुवातीला भोकरे यांनी आपला जीवनप्रवास उलगडतांना सांगितले की, सुरवातीपासून नौसेनेत काम करण्याची आवड होती. १९७० मध्ये सैनिक स्कूलची परीक्षा दिली. या चाचणी परीक्षेत नापास झालो. त्यानंतर पुन्हा परिक्षा दिली. व सैनिक स्कूलमध्ये भरती झालो. आणि सैनिक स्कूल आयुष्याचे टर्निंग पॉईट बनले.

वडिलांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असतांनादेखील वडिलांनी शिक्षणासाठी तरतूद करून ठेवली असल्याचे सांगत नौदलात कार्यरत असतांनाचा अनुभव कथन केले. त्यानंतर उपस्थितांच्या प्रश्‍नांना भोकरे यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.

कार्यक्रमाच्या सुरवातीला भारतमातेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी शिक्षणाने व दृष्टिकोनातून माणूस उच्चपद गाठू शकतो, असे भरत अमळकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीशा जैन यांनी केले. सूत्रसंचालन गिरीश कुळकर्णी यांनी तर आभार गोपाल दर्जी यांनी मानले.

LEAVE A REPLY

*