नोव्हेंबरमध्ये इवांका ट्रम्प हैदराबादमध्ये येणार; जागतिक उद्योजकतेचं नेतृत्व करणार

0

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी आणि सल्लागार इवांका ट्रम्प नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हैदराबादमध्ये येणार असल्याचं समजतं आहे.

28 नोव्हेंबर रोजी हैदराबादमध्ये होणाऱ्या जागतिक उद्योजकतेचं नेतृत्व करण्यासाठी इवांका ट्रम्प हैद्राबादमध्ये येणार आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा या परिषदेला हजेरी लावणार आहे.

अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी 2010मध्ये ही परिषद सुरू केली असून यंदाचं परिषदेचं हे आठवं वर्ष आहे.

जून महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर व्हाइट हाऊसच्या रोझ गार्डनमध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये मोदींनी इवांका यांना भारतात येण्यासाठी निमंत्रण दिल्याचं सांगितलं होतं.

मी इवांका यांना भारतात यायचं निमंत्रण दिलं आहे. मला विश्वास आहे की त्या हे निमंत्रण नक्की स्वीकारतील, असं मोदी म्हणाले होते.

LEAVE A REPLY

*