नोटाबंदीनंतर २३ हजार कोटींची अघोषित संपत्ती जाहीर

0

मंगळवारी केंद्र सरकारच्या वतीने नोटाबंदीच्या निर्णयाचे फायदे सांगण्यात आले.

नोटाबंदीदरम्यान झालेल्या परिणामांबाबत केंद्र सरकारने पुन्हा एक आकडेवारी जाहीर केली. नोटाबंदीच्या निर्णयानंतर आतापर्यंत 23 हजार कोटींची अघोषित संपत्ती समोर आल्याचे अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सांगितले.

मंगळवारी प्राप्तिकर विभागाची www.cleanmoney.in ही वेबसाइट लाँच करण्यात आली.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर 23 हजार कोटींच्या अघोषित संपत्तीबरोबर प्राप्तिकर भरणाऱ्यांच्या संख्येतही 91 लाख लोकांची भर पडल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर कर चुकवून पैशांचा व्यवहार करणे आता कठीण राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

‘8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी करण्यात आली. यामुळे डिजिटल व्यवहारांना बरीच चालना मिळाली.’ असंही जेटली म्हणाले.

LEAVE A REPLY

*