नोटबंदी ही पूर्वनियोजीतच – डॉ. विनायक गोविलकर

0

 नाशिक : नोटबंदी नंतरच्या सहा महिन्यात रिजर्व्ह बँकेने सतरा हजार कोटींच्या नोटा बाजारात आणल्या आहेत. त्यामुळे मोदी सरकारने नोटबंदी ही पूर्वनियोजित असल्याचे अर्थतज्ञ डॉ. विनायक गोविलकर नोटबंदीचे समर्थन केले.

मोदीसरकारने ८ नोव्हेबर २०१६ रोजी रात्री आठ वाजता पंतप्रधान मोदी यांनी एक हजार आणि पाचशे रुपयांची नोटा कायदेशीर चलन राहणार नाही अशी ऐतिहासिक घोषणा केली होती. त्याच पार्श्वभूमीवर ‘नोटबंदी आधी आणि नंतर’ या विषयावर गोविलकर रोटरी हॉल येथे बोलत होते.

नोटबंदी निर्णय चुकीचा नसून मोदी सरकारने पूर्वनियोजित केली असा दावा गोविलकरांनी केला. पुढे त्यांनी त्याचे चार कारने मांडली आहेत. पहिले कारण असे की, ९९ टक्के जुन्या चलनाच्या नोटा बँकेत जमा झाल्या आहेत असे रिजर्व्ह बँकेची आकडेवारी सांगते. उर्वरित १ टक्का रक्कम बँकेत का जमा झाली नाही हे सरकारचे अपयश आहे. त्याबरोबच रिजर्व्ह बँकेची नवीन चलन बाजारात वितरन करण्यास नियोजन हुकले होते. पुढे ते असे म्हणाले की,   नवीन चलन छापाई करण्यास 8 हजार कोटी छपाई खर्च आला आहे. मात्र त्यात मागील वर्षाचं तुलनेने चार हजार कोटी अधिक आहे.

जे एक टक्क चलन बँकेत जमा झाले नाही त्याची रक्कम जवळपास साडेपंधरा हजार कोटी इतकी आहे.

८ नोव्हेबर नंतर बाजारात आजवर सतरा हजार कोटी रकमेच्या नोटा बाजारात आल्या आहेत. त्यामुळे सरकारने नोटबंदी ही पूर्व नियोजत केली आहे.

बँकांनी डेटा इंटरलिंक केल्यामुळे 50 लाख लोकांना संशयास्पद व्यवहार केल्या प्रकरणी रीतसर नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत.

भारताचा जीडीपी घसरला आहे. याला काही प्रमाणत नोटबंदी कारणीभूत आहे. मात्र केवळ नोटबंदी केल्याने जीडीपी घसरला हे म्हणणे चुकीचे ठरले.

खिशातील पैसा प्रत्येकाच्या खात्यात जमा झाल्याने बाजारातील मागणी आणि पुरवठा कमी झाला आहे.
मात्र हे सर्व चित्र अल्पावधीत बदलेल अशी आशा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्तवली आहे. लवकरच भारताचा जी.डी.पी. आठ अंकावर उसळी घेईन. असे गोविलकरांनी नोटबंदीचे समर्थन केले.

 

 

 

 

LEAVE A REPLY

*