ह्या विद्यार्थिनीने मिळविलेत दहावी परीक्षेत १०० टक्के गुण

0

जिद्द असेल आणि परिश्रमाची तयारी असेल तर यशोशिखरे आपल्या पायावर लोळण घेतात हे नेहा कमलाकर नेमाडे या विद्यार्थिनीने मिळविलेल्या अभूतपूर्व यशाने पुन्हा सिद्ध केले आहे. नवीन नाशिक मधील प्रभाग क्र.२८ ची रहिवासी असलेल्या नेहाने दहावी परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून यशाची परिसीमा गाठली आहे.  आई व वडील जि.प. च्या शाळेत शिक्षक असलेल्या नेहाने आपल्या यशाचे श्रेय आजी-आजोबांसह शाळा व क्लासच्या शिक्षकांना दिले आहे.

१९३ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण
एसएससी बोर्डाच्या परीक्षेत तब्बल १९३ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० टक्के गुण मिळालेत. कारण गेल्या वर्षीपासून क्रीडा कोट्यासोबत कला आणि चित्रकला विषयाचे अतिरिक्त मार्क विद्यार्थ्यांना सरसकट देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्यामुळे काही टक्क्यांनी कमी असलेल्या विद्यार्थ्यांनाही १०० टक्के मिळालेत. इतकेच नाही तर यातील अनेक विद्यार्थ्यांनी ५०० पैकी ५१० गुणांपर्यंत मजल मारली आहे.

LEAVE A REPLY

*