नेवासा नगरपंचायत स्विकृत नगरसेवक व विषय समित्यांच्या निवडी शांततेत

0

‘क्रांतीकारी’चे अ‍ॅड. गायके तर भाजपकडून सुनिल वाघ स्विकृत नगरसेवक

 

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- नेवासा नगरपंचायचे स्विकृत नगरसेवक तसेच विषय समित्यांच्या सदस्य निवडीसाठी काल उपविभागीय अधिकारी उज्वला गाडेकर यांनी बोलावलेल्या विशेष सभेत स्विकृत सदस्य व विषय समिती सदस्यांच्या निवडी करण्यात आल्या. स्विकृत नगरसेवक म्हणून क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे अ‍ॅड. बापूसाहेब ऊर्फ काका गायके व भाजपचे सुनिल वाघ यांची निवड झाली.

 

 

विषय समित्यांचे सदस्यही यावेळी जाहीर करण्यात आले. उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांची नियोजन व विकास समितीचे सभापती झाले आहेत.
काल शुक्रवारी दुपारी नगर पंचायतच्या सभागृहात झालेल्या विशेष सभेत या निवडी करण्यात आल्या. क्रांतीकारीकडून शहीदाबी इलायतखान पठाण यांची निवड होवून अ‍ॅड गायके हे माघार घेणार होते परंतु पठाण यांचा अर्ज तांत्रीक कारणाने बाद झाल्याने ऐनवेळी बापूसाहेब गायके यांची वर्णी लागली आहे.

 

 

जाहीर झालेल्या सर्व पाच समित्यांमध्ये प्रत्येकी पाच सदस्य आहेत. क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे नगरपंचायतीत एकूण 9 सदस्य असल्याने या गटाचे तौलनिक संख्याबळ 2.64 इतके तर भारतीय जनता पार्टी, काँग्रेस व अपक्ष या विकास आघाडीचे एकूण 8 सदस्य असल्याने त्यांचे तौलनिक संख्याबळ 2.35 इतके असल्याने क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे 3 व भाजपा-काँग्रेस-अपक्ष विकास आघाडीचे 2 असे एकूण 5 सदस्यांचे नामनिर्देशन दोन्ही गटनेत्यांच्या लेखी निवेदनाप्रमाणे करण्यात आले. पुढच्या सभेत सभापतीच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

 

समितीचे सदस्य पुढील विषय समिती व सदस्य पुढीलप्रमाणे- नियोजन व विकास- क्रांतीकारी- नंदकुमार लक्ष्मणराव पाटील, फेरीजबी इमामखान पठाण व संदीप अण्णासाहेब बेहळे. भाजप आघाडी- सचिन जगदीश नागपुरे व दिनेश प्रताप व्यवहारे.

 

महिला व बाल कल्याण समिती- क्रांतीकारी- अंबिका अंबादास इरले, योगिता सतिष पिंपळे व अर्चना जितें द्र कुर्‍हे. भाजप आघाडी- सिमा राजेंद्र मापारी व अनिता भारत डोकडे.

 

अर्थ व सार्वजनिक बांधकाम समिती- क्रांतीकारी- लक्ष्मण गणपत जगताप, योगिता सतिष पिंपळे व सचिन फिलीप वडागळे. भाजप आघाडी- सचिन जगदिश नागपुरे व रणजित दत्तात्रय सोनवणे.

 

पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती- क्रांतीकारी- फारुक हाजी कासम आत्तार, संदिप अण्णासाहेब बेहेळे व अर्चना जितेंद्र कुर्‍हे. भाजप आघाडी- रणजित दत्ता य सोनवणे व निर्मला सचिन सांगळे.

 

स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य व शिक्षण तसेच क्रिडा व सांस्कृतिक कार्य समिती- क्रांतीकारी- सचिन फिलीप वडागळे, नंदकुमार लक्ष्मणराव पाटील व फेरीजबी इमामखान पठाण. भाजप आघाडी- शालिनी संजय सुखदान व निर्मला सचिन सांगळे.

 

निर्मला सचिन सांगळे व सुनिल वाघ यांनी भाजपकडून निवडणूक लढवून क्रांतीकारीचे उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांना कडवी लढत दिली होती. त्यांचा पराभव झाल्याने भाजपकडून त्यांचे पुनर्वसन करत स्विकृत सदस्यपदी निवड केली तर क्रांतीकारीच्या उमेदवार शहीदाबी इलायतखान पठाण यांचा तांत्रीक कारणाने अर्ज बाद झाल्याने अ‍ॅड बापूसाहेब ऊर्फ काका गायके यांना संधी मिळाली. ते क्रांतीकारीचे अध्यक्ष शंकरराव गडाख यांचे कट्टर कार्यकर्ते आहेत.

LEAVE A REPLY

*