नेवाशात 12 जागांसाठी 40 उमेदवार रिंगणात

0

पाच जागांसाठी आज माघार

क्रांतीकारी सर्व 12, भाजप 11, शिवसेना 5 तर काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेचा प्रत्येकी एका जागेवर उमेदवार

नेवासा (तालुका/का. प्रतिनिधी) – येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या कालच्या शेवटच्या दिवशी 12 प्रभागातील 22 उमेदवारांनी माघार घेतली. 1, 3, 11, 16 व 17 या पाच प्रभागांतील भाजपाच्या 6 उमेदवारांनी अर्ज नामंजुरीला न्यायालयात आव्हान दिल्याने निवडणूक अधिकार्‍यांनी उर्वरीत 12 प्रभागांतील अर्ज माघारीची अंतिम प्रक्रिया काल पूर्ण केली.

दरम्यान काल सायंकाळी न्यायालयाने दिलेल्या आदेशात सर्व उमेदवारांचे अपिल फेटाळून लावण्यात आले असून या प्रभागातील उमेदवारांना आज शुक्रवारी अर्ज मागे घेता येणार असून आजच उमेदवारांचे चिन्ह वाटप होवून अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
एकूण 17 प्रभागांसाठी 97 अर्ज दाखल होते. पैकी 1, 3, 11, 16 व 17 या प्रभागांचे एकूण 35 उमेदवारी अर्ज त्यात दाखल होते. न्यायालयीन प्रक्रियेमुळे या प्रभागांतील उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाहीत. अशा 35 उमेदवारांचे अर्ज वगळले तर 12 प्रभागांसाठी एकूण 22 जणांनी माघार घेतल्याने 40 अर्ज शिल्लक राहिले आहेत.
या 12 प्रभागांमध्ये सर्व 12 जागांवर क्रांतीकारी शेतकरी पक्ष निवडणूक लढवत आहे.

भाजपाने 11 प्रभागांत उमेदवार दिले आहेत. तर प्रभाग 2 मध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय सुखदान यांच्या पत्नी शालिनी संजय सुखदान यांच्यासाठी भाजपाने उमेदवार दिला नाही. काँग्रेस लढवत असलेली ही एकमेव जागा आहे. या 12 प्रभागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग 6 या एकमेव प्रभागात उमेदवार दिला असून येथून अनिता विनायक ताठे या उमेदवार आहेत. प्रभाग 7 मधून मनसेच्या अमिता विजय नहार या उमेदवार आहेत.
या 12 प्रभागांमध्ये शिवसेनेने प्रभाग 6 मधून शहरप्रमुख नितीन जगताप यांच्या पत्नी सुरेखा जगताप यांना उमेदवारी दिली आहे. प्रभाग 7 मधून जनाबाई सुर्यभान लष्करे यांना तर प्रभाग 9 मधून शहर उपप्रमुख नीरज विलास नांगरे यांना उमेदवारी दिली आहे. प्रभाग 10 मधून मुक्ताबाई शांताराम गायके यांना, 13 मधून ज्योती ज्ञानेश्‍वर काळे असे 5 उमेदवार उभे केले आहेत.
क्रांतीकारी शेतकरी पक्षाने प्रभाग 2 मधून अनिता प्रल्हाद चक्रनारायण, प्रभाग 4 मधून पुनम संदीप घोंगडे, प्रभाग 5 मधून वैभव गणपत वाघचौरे, प्रभाग 6 मधून अर्चना राजेंद्र कुर्‍हे, प्रभाग 7 मधून सरस्वती दिलीप फटांगरे, प्रभाग 8 मधून सचिन फिलीप वडागळे, प्रभाग 9 मधून राम रेणुकादास घोलप, प्रभाग 10 मधून अंबिका अंबादास इरले, प्रभाग 12 मधून माजी सरपंच नंदकुमार लक्ष्मणराव पाटील, प्रभाग 13 मधून फेरीजबी इमामखान पाठण, प्रभाग 14 मधून मनिषा अमित मापारी, प्रभाग 15 मधून गोरक्षनाथ नामदेवराव व्यवहारे यांना उमेदवारी दिली आहे.

भाजपाच्या उमेदवारांमध्ये प्रभाग 3 मधून नितीन सुरेश दिनकर, 4 मधून नम्रता विलास बोरुडे, 5 मध्ये सचिन जगदीश नागपुरे, 6 मध्ये राधा शंतनू सुर्यकर, 7 मध्ये निर्मला सचिन सांगळे, 8 मध्ये नानासाहेब छबुराव शेंडे, 9 मध्ये रणजीत दत्तात्रय सोनवणे, 10 मध्ये भामाबाई भास्कर कणगरे, 12 मधून सुनील पंडितराव वाघ, 13 मध्ये नसरीन मुक्तार शेख, 14 मधून सिमा राजेंद्र मापारी, 15 मध्ये दिनेश प्रताप मापारी हे रिंगणात आहेत.

सर्व उमेदवारांचे अपिल फेटाळले
अर्ज नामंजुरीविरोधात सत्र न्यायालयात केलेल्या अपिलावर सकाळी सुनावणी झाली. सुनावणीचा निकाल राखून ठेवण्यात आला. सायंकाळी याबाबत निर्णय देण्यात आला. सर्व उमेदवारांचे अपिल फेटाळण्यात आले. दरम्यान अर्ज माघारीची वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 असली तरी न्यायालयीन कामकाजासाठी निवडणूक अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे अर्ज माघारीस दुपारी 1 वाजता सुरुवात झाली. तोपर्यंत उमेदवारांमध्ये गोंधळ उडाला होता.

राष्ट्रवादी, मनसे व काँग्रेसचा केवळ एकच उमेदवार
माघारी प्रक्रिया पूर्ण झालेल्या 12 प्रभागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मनसे या पक्षांचे प्रत्येकी एकच उमेदवार रिंगणात राहिले आहेत. भाजपाने 11 प्रभागांत उमेदवार दिले असून प्रभाग 2 मध्ये काँग्रेसच्या शालिनी संजय सुखदान यांच्यासाठी उमेदवार दिला नसल्याचे भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर पेचे यांनी सांगितले. 

LEAVE A REPLY

*