नेवाशातील तरूण ओढ्यात वाहून गेला

0

श्रीगोंदा, श्रीरामपूर, शेवगावात मुसळधार

 

अहमदनगर (प्रतिनिधी)- सलग चौथ्या दिवशी श्रीगोंदा, शेवगाव आणि नगरमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला.

 
दरम्यान, नेवासा येथे ओढ्यास आलेल्या पुरात अक्षय अशोक गवळी हा बावीस वर्षीय तरूण वाहुन गेला. श्रीरामपूरच्या पूर्व भागात धो-धो पाऊस झाल्याने शेतात पाणीच पाणी झाले. शुक्रवारी सायंकाळी नगर शहर व परिसरात मुसळधार पाऊस झाला. श्रीगोंद्यातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळल्याने शेतात पाणी साचले होते.

 

 
शेवगावच्या काही भागात जोरदार पाऊस झाला. पाथर्डीच्या काही भागातही पावसाची रिमझीम सुरू होती. दरम्यान, गुरूवारी श्रीगोंद्यातील कोळगावात 54 तर सुप्यात 46 मिमी पावसाची नोंद झाली. कर्जतमधील राशीन 25, जामखेडमधील आरणगाव 25, राहुरीनजीकचे सात्रळ 27, लोणी 30, कोपरगावात 28 मिमी तर पारनेरात 15, पोहगावात 10, समनापुरात 16 मिमी पाऊस पडला.

LEAVE A REPLY

*