नेमबाजीत सौरभला सुवर्ण पदक

0
नवी दिल्ली । आशियाई स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारा नेमबाज सौरभ चौधरीने आज आणखी एका विक्रमाची नोंद केली. चांगवेनमध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये स्वतःचा रेकॉर्ड मोडून सौरभने ज्युनिअर 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक पटकावले.

इंडोनेशिया येथील आशियाई स्पर्धेत सौरभ चौधरीने गोल्ड मेडल पटकावले होते. सौरभ चौधरीसोबतच भारताचा युवा नेमबाज अर्जुन सिंग चिमाने सुद्धा कांस्य पदक पटकावले आहे. कोरियाच्या लिम होजिला रौप्य पदक मिळाले. उत्तर प्रदेशातील मेरठ येथील रहिवासी असलेल्या 16 वर्षीय सौरभने 245.5 अंकासह जागतिक विक्रम आपल्या नावावर केला. स्वतःच्या नावावर असलेला आणि गेल्यावर्षी जून महिन्यात बनवलेला वर्ल्ड रेकॉर्ड सौरभने आज मोडीत काढला. गेल्या महिन्यात सौरभने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये सुवर्ण पदक पटकावले होते.

त्यावेळी त्याने 240.7 गुण मिळवले होते. आशियाई स्पर्धेत भारताच्या अभिषेक वर्माला कांस्य पदक मिळाले होते. तर पहिल्यांदाच आशियाई स्पर्धेत उतरलेल्या सौरभने सुवर्ण पदकाची कमाई केली होती. आज आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये गोल्ड मेडल मिळवून आपण ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियन असल्याचे सौरभने दाखवून दिले आहे.

16 वर्षीय सौरभने पात्रता फेरीमध्ये 581 गुणांची कमाई करत अंतिम फेरीत आपलं स्थान पक्क केलं. यानंतर अंतिम फेरीत पहिल्या प्रयत्नापासूनच सौरभने आघाडी कायम राखत सुवर्णपदकाच्या दिशेने आगेकूच सुरु केली. सुवर्णपदकाच्या शर्यतीसाठी सौरभसमोर कोरियाच्या होजिन लिमचं आव्हान होतं. मात्र शेवटच्या प्रयत्नानंतर होजिनच्या खात्यात 243.1 गुण जमा झाले,

आणि सौरभने विश्वविक्रमी कामगिरी करत 245.5 गुणांसह सुवर्णपदक आपल्या नावे केलं. याचसोबत सौरभ चौधरीने आपल्या सहकार्‍यांसह सांघिक प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली. आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर लागोपाठ दुसर्‍या मोठ्या स्पर्धेत मिळवलेल्या पदकामुळे सौरभ चौधरीकडून भारताच्या आशा वाढलेल्या आहेत.

LEAVE A REPLY

*