Type to search

धुळे

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदत करा!

Share

शिरपूर | तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून शासनातर्फे व पिक विमा कंपनीतर्फे त्वरीत पंचनामे करण्यात येवून शेतकर्‍यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात यावे अशी मागणी आ. काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, तालुक्यातील सरपंच यांनी केली आहे.

निवेदनात म्हटले की, संपूर्ण शिरपूर तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांंना कोणत्याही पिकापासून उत्पन्न मिळू शकणार नाही अशी परिस्थिती झाली असून अतिपावसामुळे जमिनीवर शेवाळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मातीचा वास येईपर्यंत माती मोठया प्रमाणात सडली असून पिकांची मुळेही तग धरु शकत नाहीत. खते जमिनीत झिरपून गेली आहेत. फवारणी करण्यात आलेले किटकनाशक हे पाण्याने धुतले गेले आहेत. पुरेसा प्रकाश नसल्याने ढगाळ वातावरणात पिकांची वाढ खुंटली आहे. पिकांवर बुरशी, बोंडअळी, लाल्या असे अनेक रोग देखील पडले आहेत. वेळोवेळी हवामान खत्याने रेड अलर्ट देखील येथे घोषित केलेले होते. संपूर्ण तालुक्यात घरे, ओसरी, पशूधन, वाहने यांचे खूप मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचा शासनाकडून व पिक विमा कंपनीकडून पंचनामा करण्यात येवून शेतकर्‍यांना त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देतांना आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, जि.प.उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, माजी जि.प.उपाध्यक्ष के. डी. पाटील, अशोक कलाल, नारायण पावरा, पं.स. उपसभापती संजय पाटील, हिरालाल पावरा, दिलीप पटेल, प्रल्हाद पाटील, नारायणसिंग चौधरी, इशेंद्र कोळी, जगन्नाथ महाजन, जगतसिंग राजपूत, प्रकाश भोमा गुजर, नामदेव महाराज चौधरी, योगेश बोरसे, विजयसिंह गुर्जर, मांडळचे भटू माळी, पद्माकर देशमुख, श्यामकांत पाटील, साहेबराव पाटील, मनोज सोनवणे, भटूसिंग राजपूत, चंदू पाटील, संगा्रमसिंग राजपूत, हेमंत सनेर, सुरेश पाटील, अनिल गुजर, अविनाश पाटील, मोहन पाटील, मनोहर देवरे, किसन मराठे, सुरेश पाटील, भरत पाटील, आकाश मराठे, भुपेंद्र गुजर, रितेश राजपूत, सोनू सोनार, भुलेश्वर पाटील, शहर व तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, तालुक्यातील सरपंच उपस्थित होते.

यावेळी तहसिलदार आबा महाजन यांनी तातडीने या सर्व बाबींचा पाठपुरावा करुन लवकरच कार्यवाही करू व लवकरच अनुदान वितरित केले जाईल असे आश्वासन दिले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!