नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे

0

जिल्हाधिकार्‍यांना अहवाल पाठविणार

 

अहमदनगर (प्रतिनिधी) – शनिवार 6 व रविवारी 7 मे रोजी सायंकाळी झालेल्या वादळीवारा व पावसामुळे नुकसान झालेल्या ठिकाणी पंचनामा करुन जिल्हाधिकारी कार्यालयास अहवाल सादर करणार असल्याचे संबंधित तालुक्यांच्या अधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कळविलेल्या प्राथमिक अहवालात नमूद केले आहे.

 
नेवाशातील पाचेगावमध्ये 6 मे रोजी किरण गोरक्षनाथ भिसे हा 12 वर्षांचा मुलगा वीज पडून मरण पावला. 7 मे रोजी संगमनेर तालुक्यातील कोेकणगाव येथे वीज पडून मध्यप्रदेश राज्यातील राजेश आखंडे वय 24 याचा वीज पडून मृत्यू झाला. तालुक्यात 6 व 7 मे रोजी वादळी वार्‍यासह गारा पडल्याने घरांचे व पिकांचे नुकसान झाले आहे. श्रीरामपूरमध्ये खोकर अंदाजे 8 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेवगाव तालुक्यात अंतरवली येथे शेडवर झाड पडून 2 म्हशी दगावल्या.

 

 

श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण मंडळातील हिंगणी, गव्हाणेवाडी, ढवळगाव परिसरात घराचे व पिकांचे अंशत: नुकसान झाले असून पंचनामे सुरु आहेत. पारनेर तालुक्यातील 10 गावामधील डाळींब व भाजीपाला पिकांचे नुकासान झाल्याचा अहवाल आहे. एका घराचे नुकसान, दोन शेळ्या व 1 म्हैस वीज पडून मृत्युमुखी पडले.

LEAVE A REPLY

*