Type to search

धुळे

नुकसानग्रस्त पाच शेतकर्‍यांना ७० हजारांची मदत

Share

शिरपूर | तालुक्यातील जुने भामपूर येथे दि.२४ जून रोजी आलेल्या जोरदार पावसामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले होते. या सर्व नुकसानग्रस्तांना माजी शिक्षणमंत्री, आ. अमरिशभाई पटेल, आ.काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल यांच्यातर्फे ७० हजार रुपयांची आर्थिक मदत रोख स्वरुपात करण्यात आली आहे.

शनिवार दि.२० जुलै रोजी दुपारी २ वाजता जुने भामपूर येथील नुकसानग्रस्तांना आ.काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या हस्ते रोख आर्थिक मदत देण्यात आली. पुराच्या पाण्यासोबत वाहून आल्यावर व गाळमध्ये अडकून पडल्याने गुरे मृत्युमुखी पडले होते. गोपीचंद चिंतामण पाटील यांच्या दोन म्हशी मृत्युमुखी पडल्याने त्यांना एकूण २०,००० रुपये, जसवंत साहेबराव पाटील यांचे दोन बैल मृत्युमुखी पडल्याने त्यांना एकूण २०,००० रुपये, प्रकाश मोरचंद पाटील यांचा एक बैल मेल्याने १०,००० रुपये, संतोष राजाराम पाटील यांच्या दोन पारडया मेल्याने त्यांना १०,००० रुपये, आनंदराव गोविंदराव पाटील यांची एक गाय मेल्याने त्यांना १०,००० रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!