नीलेश पाटीलचे ढोल ताश्याच्या गजरात स्वागत

0

जळगाव |  प्रतिनिधी: ऑस्ट्रीया येथे झालेल्या वर्ल्ड स्पेशल ऑल्मिपीक गेम्स २०१७ मध्ये भारताच्या फ्लोअरबॉल संघाने उपांत्य फेरीत नायझेरीयाचा पराभव करुन विश्‍वविजेते पद पटकाविले. या संघात रिया स्पोर्टस् अकॅडमीचा खेळाडू नीलेश पाटील याचा समावेश होता.

नीलेशचे आज ऑस्ट्रीयावरुन जळगावात आगमन झाल्यानंतर ढोल ताशाच्या गजरात त्याची मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले.

यावेळी महापौर नितीन लढ्ढा, माजी महापौर विष्णू भंगाळे, फ्लोअरबॉल संघटनेचे सचिव रविंद्र चोथवे, फारुक शेख, स्नेहल फेगडे, ललित चौधरी, महेश चौधरी, महेश पाटील, विवेक आडवाणी, इकबाल मिर्झा, राजेश जाधव, विनोद अहिरे, महेंद्र सुर्यवंशी, मनोज वाणी, प्रशांत बोंडे, ललित महाजन, देवेंद्र सुर्यवंशी, विवेक महाजन, प्रा.निलेश चौधरी, प्रा.सुरेश अत्तरदे, राजेश वारके, ललित खडके, अजिंक्य देसाई, विराज कावडीया, निलेशचे वडील गोविंदा पाटील, आई लताबाई पाटील यांच्यासह खेळाडू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*