Type to search

धुळे

निसर्गमित्र समितीतर्फे प्रदूषण मुक्त दिवाळी अभियान

Share

धुळे । निसर्गमित्र समितीतर्फे येथील कृषीनगर माध्यमिक विद्यालयात प्रदूषण मुक्त दिवाळी अंतर्गत जनजागृती व पोस्टर प्रकाशन करण्यात आले.

अध्यक्षस्थानी कृषीभूषण वनश्री पुरस्कार विजेते गोपीचंद बुधा पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून निसर्गमित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे, उद्योजन पक्षीमित्र तथा प्रदेश संघटक किशोर डियालाणी, निसर्गवेध संस्थेचे डॉ. विनोद भागवत, निसर्गमित्र समितीचे प्रदेश संपर्क संघटक प्रमुख आत्माराम सोनवणे, धुळे शहराध्यक्ष प्रा.एच. ए. पाटील, राजेंद्र ढोडरे, जिल्हा संपर्क प्रमुख शाहिर विजय वाघ, रामलाल जैन,धुळे शहर संघटक प्रा.बी. एस चौधरी, खैरनार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्ष पुजन करण्यात आले. तर उद्योजक किशोर डियालाणी, राजेंद्र ढोडरे, डॉ. विनोद भागवत यांनी प्रदुषण विषयी, पक्षांविषयी व पर्यावरण विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पी. के. पाटील यानी केते तर सुत्रसंचालन श्रीमती पी.एस.देवरे यांनी केले. तर आभार एस.व्ही.पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एस.एस.पाटील, के.व्ही. देवरे, पी.एम. साबळे, एस.के.पाटील, टी.आर. कचवे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!