निविदा प्रक्रियेच्या घोळामुळे अमृत योजनेवर गंडांतर येण्याची शक्यता

0

जळगाव |  प्रतिनिधी :  निविदा प्रक्रियेच्या घोळामुळे नगरविकास विभागाचे उपसचिव यांनी अमृत योजना रद्द का करण्यात येवू नये असा प्रश्‍न उपस्थित केला असल्याने अमृत योजनेवर गंडांतर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जळगाव महानगरपालिकेला अमृत योजनेतून पाणी पुरवठा योजना मंजुर झाली आहे.

यासाठीची निविदा देखील प्रशासनाने मंजुर केली आहे. परंतू स्थायी समितीने अमृत योजनेचा प्रस्ताव नामंजुर केला आहे. दरम्यान या योजनेच्या कामाला मक्तेदाराकडून कार्यादेश देण्याबाबत १५ दिवसानंतर कायद्यातील तरतुदीनुसार प्रस्ताव मंजूर करण्यास हरकत नाही असा अभिप्राय आयुक्तांनी सरकारकडे दिला आहे.

निविदा प्रकियेच्या या घोळामुळे ही योजना रद्द का करण्यात येवू नये असा सवाल उपसचिवांनी उपस्थित केल्याने अमृत योजना रद्द होण्याची शक्यता आहे .

अमृत योजनेबाबत नगरविकास विभागाची बैठक झाली. यावेळी आयुक्त जीवन सोनवणे, शहर अभियंता दिलीप थोरात उपस्थित होते. निविदा प्रक्रियेच्या तिढयामुळे नगरसचिवांनी ही योजना रद्द का करण्यात येवू नये असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. अमृत योजनेसाठी गेल्या महिन्यात १९१ कोटी रुपयांच्या कामांसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या.

त्यात संतोष इन्फास्ट्रक्चर प्रा. लि. व विजय कन्ट्रक्शन प्रा. लि. ची ४.३२ टक्के दराची सर्वात कमी निविदा होती. त्यामुळे ही निविदा प्रशासनाने मंजूर केली आहे. या मक्तेदारास कार्यादेश देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या सभेत ठेवला होता. त्यावर ठोस निर्णय मक्तेदाराबाबतच्या शंकाची माहती कोर्टात देण्याबाबत ठराव करण्यात आला.

मात्र ठरावाची प्रत वेळेत आयुक्तांकडे न पोहचल्याने महापालिका ऍक्टनुसार १५ दिवसांत यात निर्णय न झाल्यास प्रस्ताव मंजूर समजला जातो, अशी तरतूद आहे. त्यानुसार आयुक्तांनी हा प्रस्ताव सरकारला पाठविला. त्यानतंर स्थायी सभापती यांच्याकडून  हा प्रस्ताव अमान्य असल्याचा ठराव आयुक्तांकडे पाठविण्यात आला.

आयुक्तांनी तो प्रस्ताव देखील शासनाकडे पाठविला आहे. दुसरीकडे निविदा प्रकीयेच्या निकषांबाबत हायकोर्टात देखील सुनावणी सुरु आहे.

LEAVE A REPLY

*