निवडूक प्रचारात रंगत ; ‘सावाना’ आधुनिक बनविण्याचे जाहीरनामे

0

नाशिक : शहराचे सांस्कृतिक केंद्र ठरलेले ‘सावाना’च्या निवडणूक प्रचाराला रंगत आली आहे. निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या तिन्ही पॅनलनी आपले जाहीरनामे प्रसिद्ध केले असून त्यात वाचनालय संगणक साक्षर करण्याबरोबरचे अश्वासन दिले आहे. सर्व उमेद्वारांकडून सभासदांच्या प्रत्येक्ष भेटीला प्राधान्य दिले जात आहे.

‘सावाना’चे नवे कारभारी ठरवण्यासाठी 2 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तशी प्रचारात रंगत वाढत आहे. त्याचबरोबर आरोप-प्रत्यारोपांची धारही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रोज एक नवीन नाट्य पाहायला मिळत असल्याने नाशिककरांचे याकडे लक्ष लागले आहे. निवडणुकीसाठी सभासदांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार विविध उपाययोजना अंमलात आणत आहेत. दरम्यान तीनही पॅनेलच्या उमेदवारांनी सभासदांच्या घरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला आहे.

स्व. मु. शं. औरंगाबादकर-झेंडे पॅनेलने आपल्या जाहीरनाम्यात वाचनालयाचे डिजिटलायझेशन करण्याचे आश्वासन दिले आहे. यानूसार सर्व ग्रंथ संपदेचे बारकोडिंग करून सर्व पुस्तकांची नोंद संगणकात करण्यात येणार आहे. सावाना व्यवस्थापन व सभासद यांच्यात समन्वय साधण्यासाठी प्रयत्न करण्याचा ग्रंथमित्र पॅनेलने निर्धार व्यक्त केला आहे. स्व. गो. ह. देशपांडे वाचनालयाचेही संगणकीकरण करण्याचे म्हटले आहे. वाचक मेळावा, रंगकर्मींशी सुसंवाद, तसेच सप्टेंबरच्या अगोदर वार्षिक सभा घेण्याचे आश्वासन दिले आहे.

जनस्थान पॅनेलनेही सावानाच्या पुस्तक देवघेव विभागाचे संपूर्ण आधुनिकीकरण करण्याचे आश्वासन दिले आहे. पोथी विभागाची व्यवस्थित काळजी घेणे, दुर्मिळ ग्रंथांची यादी संकेत स्थळावर टाकणे, प.सा.नाट्यगृह अत्याधुनिक करणे, सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना देणे, पार्किंग समस्येवर तोडगा काढणे, सावानास आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे आश्वासन अभय ओझरकर यांच्या जनस्थान पॅनेलने दिले आहे.

नवले, तांबट यांच्यावर अन्याय : सावानाच्या सेवेत कै. राजाभाऊ शहाणे, तुकाराम नवले, दादा देशपांडे, यादवराव कुलकर्णी व मुरलीधर तांबट यांचे योगदान मोठे आहे. यांनी अगदी 50-60 रुपये पगारावर काम केले. तात्यासाहेब शिरवाडकर व मु. शं. औरंगाबादकर यांनी नवले व तांबट यांना सेवानवृत्तीनंतर पाचशे रुपये मासिक मानधन सुरू केले. मात्र, मिलिंद जहागिरदार यांनी मनमानीपणे आपल्या कार्यकाळात या दोघांचे मानधन बंद केले. या दोघांचेही वय आज 89-90 च्या आसपास आहे. अखेर मी आवाज उठविला आणि सततच्या पाठपुराव्यानंतर चाळीस महिने बंद असलेले दोघांचेही मानधन पुन्हा सुरू झाले.
– रमेश जुन्नरे, स्वतंत्र उमेदवार

LEAVE A REPLY

*