निवडणूक भडकविण्यासाठी नव्हे विकासकामांसाठी; आमदार संग्राम जगताप यांचे प्रतिपादन

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- या पुर्वी नगर शहराच्या निवडणुका फक्त जातीवादावर लध्वल्या विकासाचा मुदयावर कधीच लध्वल्या नाहीत. त्यामुळे नगर शहर विकासापासून वंचित राहिले. नागरीकांच्या माध्यमातून मला महापौर पदाची असो की आमदार पदाची संधी मिळाली त्या माध्यमातून आम्ही फक्त आणि फक्त हया शहराच्या विकासासाठीच मोठया प्रमाणात निधी कसा आणू शकतो यासाठी प्रयत्न केले. केंद्र किंवा राय शासनाचा निधी असो, आम्ही महापालिकेत मोठा निधी उपलब्ध केला आणि 40 टक्के विकासाचा गाडा ओध्ण्यात यशस्वी झालो. मुजाहिद खुरेशी यांना पाहिल्या पासून सामाजिक काम करण्याची आवड आहे. राजकारण नंतर पहिले नागरीकांचे प्रश्‍न अडचणी हया त्या आपल्या समजून कायम सोडवितात. निवडणुक ही धार्मिक नसून विकास कामासाठी असते असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
प्रभाग 19 मध्ये नगरसेविका ख्वाजाबी कुरेशी यांच्या प्रयत्नातून रामचंद्र खुंट ते जिल्हाधिकारी कार्यालय बंद पाईपलाईन गटार व रस्ता डांबरीकरण कामाचा शुभांरभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रंसगी मा.आ.दादाभाऊ कळमकर, नगरसेवक संपत बारस्कर, फैय्याज केबलवाले, शौकत तांबोळी , मुजाइद खुरेशी, संजय घुले, अविनाश घुले, मन्सुर शेख, उबेद शेख, साहेबान जागीरदार, हाजी मुस्ताक खुरेशी, वाहिद खुरेशी, अमित खामकर, मुन्नाशेठ चमडेवाले, सय्यद अक्तरअली, दादू सुभेदार, मुक्तार अहमद खुरेशी, असलम बागवान, निसार बागवान, हरुनभाई खुरेशी, अनुप खंडेलवाल, अनिल लुंकड, गयाज खुरेशी, मुऋती अलताफ, निसार बागवान, सय्यद इरफान, जिया खाजा, हबीब बागवान, शोयब खान, सय्यद मुन्ना, शिवा काळभोर, राम पठारे, इसाक बापू , असगर मामू, सलीम रेडियमवाला, कद्दस बागवान, अलतमश जरीवाला उपस्थित होते.
आ. संग्राम जगताप पुध्े म्हणाले काही विघ्नसंतोषी लोकांनमुळे आपल्या भागातील सुख-शांती भंग होऊ नये हे पाहण्याची गरज आहे. नगर शहर शांत कसे राहिल ! उदयोग व्यवसाय कसे नांदतील ! सर्व लोक सुखानी कसे नांदतील याची खबरदारी घेण्याची गरज आहे. विकासाच्या बाबतीत आम्ही सर्व भागामध्ये प्रयत्नशील आहोत. महानगर पालिका आज राष्ट्रवादीच्या ताब्यात नाही. यावेळेला राष्ट्रवादीची सत्ता होती त्यावेळी राष्ट्रवादीने मोठया प्रमाणावर विकास निधी आणून विकासाची कामे केलेली आहेत. जे मंडळी सांगायचे की आमची सत्ता दिल्ली मध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे यावेळी आमची सत्ता अहमदनगर महानगर पालिकेवर येईल त्यावेळी आम्ही खुप मोठा निधी आणू अशा प्रकारच्या वर्गना करायची . आज तुम्हांला सांगतो जेव्हा पासून सत्ता बदली महापालिकेवर सत्तेवर असणारे सत्ताधारांचे वर्ष उलटून गेले तरीही कुठला मोठा निधी त्यांनी महापालिकेसाठी आणला ? हे जाहिर करावे त्यांनी कुठलाही निधी आणला नाही. त्यामुळे ते जाहिर ही करु शकत नाही. नागरीकांचे मुख्य प्रश्‍न मोकाट जनावरे, मोकाट कुत्री, कचरा कुंडीचा, आरोग्याचा इ. प्रश्‍न महापालिकेकडून सोडवले जात नाहीत. त्याची अपेक्षा आपण कोणाकडून करायची असा प्रश्‍न नागरीकांमध्ये निर्माण झालेला आहे. आमच्या भागात आमदार निधी काय असतो हे संग्राम जगताप यांच्या माध्यमातून आम्हांला समजले असे मनोगत शौकत तांबोळी यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

*