निवडणूक खर्च सादर करण्यात राजकीय पक्ष पास

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक खर्च दिलेल्या मुदतीमध्ये सादर करण्यात सहभागी सर्वच राजकीय पक्ष पास ठरले आहे.

 

जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक निकालापासून दोन महिन्यात निवडणूक लढविणार्‍या राजकीय पक्षाने जिल्हाधिकारी निवडणूक शाखेकडे खर्च सादर करणे बंधनकारक आहे. तर, उमेदवारांना 1 महिन्याची मूदत असते.दरम्यान झेडपीचे 33 व पंचायत समितीच्या 58 उमेदवारांनी वेळेत खर्च सादर न केल्याप्रकरणी त्यांना कारणे दाखवा नोटिसा पाठविण्यात येवून सदर प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांपुढे सुनावणी घेण्यात आली.

 

 

राजकीय पक्षांना 2 महिन्याचा कालावधी असल्याने सुरवातीला याकडे पक्षाच्या नेत्यांनी दुर्लक्ष केले. मात्र, मूदत संपण्याचा कालावधी जवळ आल्याने प्रत्येक पक्षाने कारवाईचा धसका घेत खर्च जमवा-जमवीसाठी धडपड सुरु करुन वेळेत खर्च सादर करण्यात यशस्वी झाले.

 

 

सेना, काँग्रेसचा खर्चच नाही सेना, काँग्रेसचा खर्चच नाही  राजकीय पक्षांनी निवडणूकी दरम्यान केलेल्या खर्चाची माहिती प्रपत्र 5 ते 9 मध्ये भरून देणे आवश्यक आहे. मात्र,  शिवसेना (उत्तर व दक्षिण), नॅशलिस्ट कॉगे्रस पार्टी व भारतीय कम्युनिस्ट पार्टी यांनी खर्चाची आकडेवारी न टाकता निरंक असल्याचा उल्लेख केला.हे विशेष.यामुळे या पक्षांनी निवडणूकीत नेमकी किती खर्च केला. याबाबत प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

 

 

खर्चात भाजपची आघाडीवर खर्चात भाजपची आघाडीवर  जिल्ह्यात एकूण 8 राजकीय पक्षांनी निवडणुकीत उडी घेतली होती.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत सर्वात जादा खर्च करणारा पक्ष म्हणून भाजपची नोंद आहे. भाजपने 2 लाख 49 हजार 736 रुपये , राष्ट्रवादीने 1 लाख 11 हजार 54 रुपये, जनशक्ती विकास आघाडीचा 46 हजार 350 रुपये, क्रांतीकारी शेतकरी पक्षाने 47 हजार 675 रुपये खर्च केल्याचे नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

*