निळवंडेतून आजपासून आवर्तन

0
अकोले (प्रतिनिधी)-निळवंडे धरणातून आज शुक्रवारी दुपारी 2 वाजता उन्हाळी हंगामा करिता सिंचनाचे आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली.
उन्हाळ्यातील सिंचनाचे हे दुसरे व शेवटचे आवर्तन असणार आहे या आवर्तनात सिंचन ,पिण्याचे व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मंजूर पिण्याचे गावतळे भरून देण्यात येणार आहेत. हे आवर्तन अंदाजे 26 ते 28 दिवस सुरू राहणार आहे. या आवर्तनात अंदाजे 3 हजार 600 दलघफू पाणी वापर होण्याची शक्यता आहे. या आवर्तनात साधारणतः 9 हजार 500 ते 10 हजार हेक्टर क्षेत्राचे सिंचन होईल.
या आवर्तनात कोणी लाभ धारकांनी बेकायदेशीर पाणी चोरण्याचा प्रयत्न केला अथवा पाण्याचा गैरवापर केला तर अशा लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील तसेच कर्मचार्‍यांनी कामात हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावरही फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

 

LEAVE A REPLY

*