निर्भया प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आज देणार निर्णय

0

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील 4 दोषींच्या फाशीची शिक्षा कायम राहाणार की नाही? याचा निर्णय शुक्रवारी सुप्रीम कोर्टात होणार आहे.

चारही दोषींनी फाशीच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे.

न्यायाधिश दिपक मिश्रा यांच्या नेतृत्वातील पिठाने फास्ट ट्रॅक सुनावणीनंतर 27 मार्चला आपला निर्णय राखिव ठेवला होता.

16 डिसेंबर 2012 च्या रात्री दिल्लीत एका चालत्या बसमध्ये 6 आरोपींनी निर्भयासोबत सामूहिक अत्याचार केले होते. त्यानंतर तिला बसमधून फेकून दिले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता.

 

LEAVE A REPLY

*