Type to search

आरोग्यदूत

निरोगी दातांसाठी दातांची काळजी

Share

1) बालकाचे दात व हिरड्या राखण्यासाठी योग्य सवयी शिकवाव्यात, दात कसे साफ करावेत, या बाबतीत त्याला हळूवारपणे व प्रेमाने शिकवावे. वारंवार त्याला प्रात्यक्षिक करून दाखवावे लागते. निरीक्षणातून ते दात घासण्याची कला योग्य प्रकारे शिकते. रोज दोन वेळा दात साफ करण्याची सवय लावावी.

2) दिवसा केव्हाही काहीही खाल्ले म्हणजे पाण्याने चूळ भरून दात साफ करून घेण्याची सवय लावावी.

3) योग्य आहार – पुरेशा प्रमाणात हिरव्या पालेभाज्या, फळे, दूध, मांसाहार असावा. त्यामुळे पुरेसे कॅल्शियम मिळून दातांचे पोषण योग्य प्रकारे होते.

4) अयोग्य आहार टाळावा – अतिचिकट स्वरुपाचे पिष्टमय पदार्थ टाळावेत. उदा. चिकट स्वरुपाची मिठाई, टॉफीज, चॉकलेट, केक, पॅस्ट्रीज, जॅम, चिकट कॅन्डीज् इ. हे पदार्थ खावयास दिले तर नंतर दात व हिरड्या स्वच्छ कराव्यात. वारंवार असे पदार्थ देऊ नयेत.

5) काही आई-वडील मुलांच्या तोंडात बराच वेळपर्यंत दुधाची बाटली ठेवतात. त्यामुळे बराच वेळपर्यंत दुधातील साखर दातांवर साचते. त्यामुळे दातांवर त्यामधील आम्लाचा घातक परिणाम होतो. विशेषत: वरच्या जबड्यातील पटाशीचे दातांवर परिणाम होतो.

त्रास असो वा नसो; परंतु दातांची नियमित तपासणी दंतरोग तज्ञाकडून करवून घ्यावी. त्यामुळे दातांच्या काळजीचे मार्गदर्शन नियमितपणे मिळते. तसेच दातांचे काही रोग दिसावयास लागल्यास याबद्दल पुरेशी कल्पना सुरुवातीलाच येते.
दंतरोगतज्ञास नियमित भेट दिल्यामुळे बालकाच्या मनात दंतवैद्याबद्दल भीती राहत नाही व त्याला दातांचा त्रास झाल्यास ते सहकार्य देते. या उलट जर दात दुखत असताना पहिल्यांदाच दातांच्या डॉक्टरकडे रोग्यास नेल्यास रोगाच्या वेदनेने कासावलेले बालक दातांच्या डॉक्टरांबद्दल अधिक धास्ती घेते. वेदनेमुळे आणि अपरिचयामुळे त्यांना सहकार्य देत नाही. त्याच्या मनातील भीती हे मोठे होईपर्यंत तशीच कायम राहते.

तुम्ही दात घासत असताना बालकाला तुमचे निरीक्षण करू द्या. अनुकरणातून बालक शिकते. पुढचे चार दात आल्यावर त्याला ब्रशवर थोडी टूथपेस्ट लावून खेळू द्या. त्याला स्वत:लाच दात घासू देण्याची सवय लावा. मात्र तो टूथपेस्ट नुसतीच गिळणार तर नाही ना याकडे लक्ष असू द्या.

जर पडलेल्या दातांची जागा कृत्रिम दातांनी भरून काढली नाही तर त्याचे दोन्ही बाजूचे दात सरळ उभ्या रेषेत न राहता मोकळ्या जागेकडे झुकतील; मोकळ्या जागेत अन्नकण साचून रोगजंतूंची वाढ होईल व दात स्वच्छपणे साफ करता येत नाहीत.
डॉ. प्रमोद महाजन

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!