निरगुडे आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू

0

पेठ (सुनील धोंडगे) : निरगुडे (क) येथील शासकीय अनुदानित आश्रमशाळेतील चौथीत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

तुषार नामदेव जाधव असे विद्यार्थ्याचे नाव असून तो चौथी ईयत्तेत शिकत होता. तुषार गावानजिक असलेल्या तलावात आंघोळीसाठी  गेला होता. पण त्याला येण्यास उशीर झाला त्यामुळे सदरचा प्रकार उघडकीस आला.

दरम्यान, त्यास उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले अशी माहिती संस्थेच्या मुख्यध्यापिका विमल खंबाइत यांनी दिली.

मृतदेहाचे शवविच्छेदन पेठच्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. तलावात शाळकरी मुले बुडून मरण पावल्याची नजिकच्या कालावधीतील ही तिसरी घटना असल्याने आश्रमशाळेतील नियोजनाबाबत तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्यात यावा अशी मागणी विद्यार्थ्याच्या पालकांकडून करण्यात येत आहे.

1 COMMENT

  1. आश्रम शाळेत गरीब आदिवासी आपल्या मुलामुलींना शिकण्यासाठी नाईलाजाने पाठवतात.कारण त्यांची आर्थिक परिस्थिती!शासन कोट्यवधी रुपये अनुदान अशा शाळा चालविणाऱ्या भामट्यांच्या घशात दरवर्षी ओतत असते पण आदिवासी मुलींचे लैंगिक शोषण,कुपोषण,निकृष्ट आहार,सर्पदंश,अंघोळीची सोय शाळेत नसल्याने मुले तलाव,नदी आदि ठिकाणी उन वारा,,थंडी,पाऊस ह्याचा विचार न करता अंघोळीसाठी जातात.कुठल्याच राजकीय पक्षाला हे प्रश्न घेऊन आंदोलन करावेसे वाटत नाही.

LEAVE A REPLY

*