नियमबाह्य खातेवाटपाची सदस्य करणार मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

0

जळगाव / जिल्हा परिषदेच्या विषय समित्याचे खातेवाटप अध्यक्षांनी नुकतेच जाहीर केले.

यात अध्यक्ष उज्वला पाटील यांनी महिला बालकल्याण समिती सभापती पद रजनी चव्हाण यांच्याकडे असतांना देखील बांधकाम समितीचे सभापती पद त्यांच्याकडे देवून नियमबाह्य पध्दतीने खातेवाटप केली असल्याने जिल्हा परिषदेचे काही सदस्य याबाबत मुख्यमंत्र्याकडे तक्रार करणार आहे.

दरम्यान निवड समिती सदस्य व खातेवाटपाचा अहवाल प्राप्त झाला असून खातेवाटप नियमसंगतीत नसल्यास कारवाईचा इशारा सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिला आहे.

जिल्हा परिषदेच्या खाते वाटप व विषय समित्याच्या सदस्य निवडीचे अधिकार अध्यक्ष उज्वला पाटील यांना देण्यात आले होते.

त्यानुसार त्यांनी विषय समित्यांसाठी आयोजित विशेष सभेत खातेवाटप, विषय समिती सदस्यांची निवड न जाहीर करता सभा आटोपली होती.

त्यानंतर अध्यक्षांनी वरिष्ठांच्या आदेशावरून तब्बल 15 दिवसानंतर सभापतींना खातेवाटप व विषय समित्यांच्या सदस्यांची निवड जाहीर केली.

यात उपाध्यक्षांना डावलून त्यांच्याकडे केवळ कृषी व पशुसंवर्धन दुग्धशाळा समितीचे सभापती पद देण्यात आले.

पूर्वीपासून उपाध्यक्ष यांच्याकडे बांधकाम व अर्थ समितीचे सभापतीपद देण्याचा प्रघात असून रजनी चव्हाण यांच्याकडे महिला बालकल्याण समितीचे सभापती पद असतांना त्यांच्याकडे बांधकाम समितीचे सभापतीपद देवून अध्यक्षांनी नियमबाह्य खातेवाटप जाहीर केले आहे.

 

LEAVE A REPLY

*