निमशासकीय कर्मचार्‍यांनाही समूह अपघात विमा लागू

0

जि.प., पालिका, ग्रामपंचायती, शैक्षणिक संस्थांचा समावेश

 

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना राज्यातील शासकीय विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणखालील सर्व निमशासकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांना 1 ऑगस्ट 2017 पासून लागू करण्यात येत आहे. हा विमा पुढील वर्षापासून (1एप्रिल) अंमलात आणली जाणार आहे. यातून कंत्राटी कर्मचारी वगळण्यात आले आहे. या योजनेचा लाभ राज्यासह नगर जिल्ह्यातील कर्मचारी आणि अधिकार्‍यांना होणार आहे.

 

संबंधित विमा योजना याआधी महाराष्ट्र संवर्गातील भारतीय प्रशासकीय सेवेतील व भारतीय वन सेवेतील अधिकार्‍यांना 1 एप्रिल 2016 पासून लागू करण्यात आलेली आहे. ही योजना शासकीय कर्मचार्‍यांसाठी लाभदायी असल्याचे आढळून आली. तसेच ही योजना अनुदानियत शाळांमधील कर्मचार्‍यांना विम्याचे संरक्षण देण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली आहे. निमशासकीय कार्यालये, सांविधानिक मंडळे यांनाही ही योजना लागू करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली होती. त्यानुसार वित्त विभागाने हा निर्णय घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक काल जारी करण्यात आले.

 

 

या योजनेत सहभागी होण्यासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांना अनुमतिपत्र व नामनिर्देशन पत्र विभागप्रमुख व कार्यालय प्रमुखाकडे देणे अनिवार्य आहे. या विम्याचा हप्ता सप्टेबर 2017 च्या वेतनातून कपात केला जाणार आहे.
गट अ ते ङ साठी 10 लाख राशीभूत विमा रक्कम असून वार्षिक वर्गणी 300 तर जीएसटीचे 18 टक्के असे 54 रूपये. एकूण 354 रूपयांचा हप्ता असेल.

 

 

या विमा योजनेतंर्गत अपघातामुळे मृत्यू, कायमचे अपगंत्व, विकलांगता, अपघातात दोन हात, दोन पाय किंवा दोन्ही डोळे गमावून अपंगत्व आल्यास राशीभूत विमा रक्कम 100 टक्के मिळेल असे नमूद करण्यात आले आहे. इतर अवयंवासाठीही राशीभूत विमा रकमेची टक्केवारी वेगवेगळी आहे.

 

 

यांना विम्याचा लाभ
सर्व निमशासकीय कार्यालये, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, ग्रामपंचायती, मनपा, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, शासकीय महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सांविधानिक संस्था, मान्यताप्राप्त व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, कृषी विद्यापिठांमधील अधिकारी आणि कर्मचारी यांना ही निमा योजना लागू होणार आहे.

LEAVE A REPLY

*